चाकणमध्ये अनैतिक संबंधातून कंपनीच्या मॅनेजर ची हत्या ! Gopal Motghare
मुंबई/पुणे

चाकणमध्ये अनैतिक संबंधातून कंपनीच्या मॅनेजर ची हत्या !

पिंपरी-चिंचवडच्या चाकण पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नानेकरवाडी येथील भवानी इंडस्ट्रीचा मॅनेजर अमोल गजानन राणे यांची विवाहबाह्य संबंधातून हत्या झाली आहे.

गोपाल मोटघरे

चाकण : पिंपरी-चिंचवडच्या चाकण पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नानेकरवाडी येथील भवानी इंडस्ट्रीचा मॅनेजर अमोल गजानन राणे याची हत्या अनैतिक विवाह बाह्य संबंधातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे देखील पहा -

अमोल राणे यांच्या खुनाचे सीसीटीव्ही फूटेज साम टीव्हीच्या हाती लागेल आहेत. या सीसीटीव्ही फूटेज मध्ये भवानी इंडस्ट्रीतील कामगार रामेश्वर वामन पवार हा अमोल राणे याला लोखंडी रॉडने मारताना दिसत आहे. रामेश्वर पवार यांच्या बायकोचे अमोल राणे यांच्याशी अनैतिक विवाह बाह्य संबध आसल्याचा संशय रामेश्वर पवार याला होता.

याच संशयातून रामेश्वर पवार याने अमोल राणे याचा लोखंडी रॉड ने मारून खून केला, त्यानंतर रामेश्वरने आपल्या पत्नीला देखील लोखंडी टेबल ने मारून खून करण्याचा प्रयत्न केला आहे. असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. रामेश्वर पवार हा मूळचा अकोला जिल्ह्यातील रहिवासी असून चाकण पोलिसांनी रामेश्वरला अकोला जिल्ह्यातील काजळेश्वर गावातून अटक केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT