नोकरीच्या बहाण्याने यायचे 2 वर्ष काम करायचे अन् चोरी करुन निघून जायचे Saam TV
मुंबई/पुणे

नोकरीच्या बहाण्याने यायचे 2 वर्ष काम करायचे अन् चोरी करुन निघून जायचे

तक्रारदाराच्या बोटीवर काम करणाऱ्या एका नेपाळीने आपल्या साथीदारांसह चोरी केल्याचे आणि चोरी केल्यानंतर वेगवेगळ्या राज्यात पळून गेल्याचे तपासात निष्पन्न झाले.

सुरज सावंत

मुंबई: नोकरीच्या बहाण्याने मुंबईसह देशाच्या इतर राज्यात जाऊन एक ते दोन वर्षे काम करून संधी साधून चोरी करणाऱ्या नेपाळी टोळीतील तीन चोरट्यांना मुंबईच्या मालवणी पोलिसांनी (Police) अटक केली आहे. संधी मिळताच ते आपल्या बाकीच्या साथीदारांसह चोरी करून इतर राज्यात पळून जायचे.

मालवणीचे पीएसआय हसन मुलाणी यांनी सांगितले की, मालाडमधील माळ भागात मच्छिमारांकडे गेल्या दोन वर्षांपासून काम करणाऱ्या सुमन जनक शाही नावाच्या नेपाळीने आपल्या तीन साथीदारांसह मढ येथील एका पेट्रोल पंपाच्या कार्यालयाचे कुलूप ३० डिसेंबरच्या रात्री ९१ हजारांची रोकड तिजोरी तोडून चोरी केली. या प्रकरणी मालवणी पोलिसांत तक्रार नोंदवल्यांतर सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी तपास केला असता. तक्रारदाराच्या बोटीवर काम करणाऱ्या एका नेपाळीने आपल्या साथीदारांसह चोरी केल्याचे आणि चोरी केल्यानंतर वेगवेगळ्या राज्यात पळून गेल्याचे तपासात निष्पन्न झाले.

मालवणी पोलिसांनी तीनही नेपाळी आरोपींना देशातील विविध राज्यातून तांत्रिक माहितीच्या आधारे अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव 1. प्रवीण बसंत शाही, त्याचे वय 33 वर्षे असून, पोलिसांनी त्याला बंगळुरू येथून अटक केली आहे. भारत रन बहादूर शाही असे दुसऱ्या आरोपीचे नाव असून तो २२ वर्षांचा असून त्याला पोलिसांनी राजकोट येथून अटक केली आहे. तर तिसर्‍या आरोपीचे नाव सुमन जनक शाही आहे, वय 36 वर्षे आहे आणि त्याला मालाडच्या मढ परिसरातून अटक करण्यात आली आहे, हे सर्व आरोपी नेपाळमधील कालीकोट जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

पेट्रोल पंप कार्यालयात चोरी करण्यापूर्वी आरोपींनी रेकी केली, नंतर कुलूप तोडून 91 हजार 600 रुपये चोरून पळ काढला, सुदैवाने पेट्रोल पंपाचे उर्वरित पैसे आधीच बँकेत जमा होते, पोलिसांनी आरोपींना अटक करून चौकशी केली असता या टोळीतील 11 जणांनी मिळून काही महिन्यांपूर्वी भिलवाडा येथे दोन ठिकाणी 26 लाखांची चोरी केल्याची कबुली दिली असल्याचे समोर आले. पोलिसांनी सांगितले की हे चोर कधीही फोन कॉलद्वारे चोरीची योजना आखत नाहीत, ही टोळी फेसबुक आणि मेसेंजर कॉलिंगद्वारे संपर्कात राहून चोरीचा कट आखतात, ज्याने करून पोलिसांना कॉल रेकॉर्ड मिळत नाहीत आणि पोलिसांची तपासात दिशाभूल होते. या प्रकरणात अधिक तपास मालवणी पोलिस करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirgrahi Yog: 100 वर्षांनी मंगळाच्या राशीमध्ये बनणार पावरफुल त्रिग्रही योग; 'या' 3 राशींवर बरसणार छप्परफाड पैसा

Bacchu Kadu: बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा, नागपूरात चक्काजाम, प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरावर दरोडा, जळगावच्या घरातून सोनं, रोकड लंपास

IND VS AUS: एकमेव 'या' भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धुतलं, ठोकलं दमदार शतक

Maharashtra Flood: अतिवृष्टीग्रस्तांना आतापर्यंत 8 हजार कोटींची मदत, पुढच्या 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 11 हजार कोटी

SCROLL FOR NEXT