Uddhav Thackeray News, Political Crisis in Maharashtra Saam TV
मुंबई/पुणे

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती कॉंग्रेस नेत्यांनी दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना कोरोनाची (Corona Virus) लागण झाल्याची माहिती मिळत आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कमलनाथ हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार होते. मात्र त्याआधी त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती कमलनाथ यांनी पत्रकारांना दिली आहे. (CM Uddhav Thackeray Corona Positive Marathi News)

एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेसाठी संघर्षाचा काळ सुरु असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोरचं संकट काही केल्या संपत नाहीये. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज सकाळी कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. असं असतानाच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे .

काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याबरोबरच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे यांना जरी कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती ठीक आहे. काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याशी त्यांचं बोलणं झालं आहे, अशी माहितीही नाना पटोले यांनी दिली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood pressure monitoring: ब्लड प्रेशर नेमका कधी चेक करावा? दिवसभरातील 'हा' टाइम सर्वात बेस्ट

Kitchen Hacks : मिक्सर, मसाले अन् डब्यांचा पसारा? 'या' ३ ट्रिक्सने किचन दिसेल चकाचक

Ajay Devgn: अभिनेता अजय देवगणला BMC चा दणका; जुहूच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा

Maharashtra Politics: मोठी बातमी! दसऱ्यानंतर शिवसेनेत होणार मोठे फेरबदल, एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देणार

Maharashtra News Live Update:इंटरनेट वापरणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क

SCROLL FOR NEXT