Eknath Shinde on Maratha Andolan Mumbai Saam Digital
मुंबई/पुणे

Eknath Shinde News: मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्री सरसावले; केली मोठ्या मदतीची घोषणा

Eknath Shinde Latest News: मराठा आरक्षण लढ्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत जाहीर केली आहे.

Satish Daud

Eknath Shinde on Maratha Andolan

मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण लढ्याला आज मोठं यश मिळालं. राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: नवी मुंबईत येऊन जरांगेंच्या हाती सरकारचा अध्यादेश सोपवला. इतकंच नाही, तर त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना देखील मदत जाहीर केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी मराठा बांधवांना संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "मराठा बांधवांच्या कुटुंबियांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. त्यांना देखील नोकऱ्या देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. नुकसानभरपाई म्हणून ८० लोकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाखांची मदत दिली जाईल". (Latest Marathi News)

"त्याचबरोबर मृतांच्या वारसांना नोकऱ्या देखील देण्यात येईल. हे सरकार सर्वसामान्याचं सरकार आहे. त्यामुळे गुन्हे मागे घेण्याचे तसेच इतर निर्णयांची पूर्ण अंमलबजावणी करण्याचं काम करण्याचा आम्ही शब्द देतो", असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केलं आहे.

मराठा समाजाला कोणकोणत्या सवलती मिळणार?

मराठा समाजाला आता कोणकोणत्या सवलती मिळणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे. "मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतली आहे. ती शपथ पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करीत आहेत", असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

"सध्या ओबीसी समाजाला आरक्षणातून ज्या-ज्या सवलती मिळतात. त्या-त्या मराठा समाजाला देखील मिळेल, असंही मुख्यमंत्री शिंदेंनी भरसभेतून सांगितलं आहे. मराठा समाजाला ओबीसीचे अधिकार, ओबीसीच्या सवलती दिल्या जातील", असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati : अमरावती जिल्ह्यात ३५ टक्के शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून दूरच; शासनाची हमी हवेतच

Maharashtra Politics : दिवाळीत धमाका! भाजपच्या गळाला मोठा मासा, ६ टर्म आमदार कमळ घेण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

छत्रपती शिवाजी महाराज दिवाळी कसे साजरी करायचे? पाहा हे दुर्मिळ ७ फोटो

रक्तप्रवाहात अडथळा, नसा बंद पडण्याची भीती? खा १ फळ, हार्ट अटॅकचा धोका टळेल

SCROLL FOR NEXT