CM Eknath Shinde On Cabinet Expansion saam tv
मुंबई/पुणे

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिवाळीनिमित्त जनतेशी संवाद; राज्यातील विकासकामांची दिली माहिती

आरोग्य सुविधांसाठी दुप्पट निधी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिवाळी पाडव्याच्या निमित्त राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत गेल्या चार महिन्यांमध्ये सुरू केलेल्या कामाची यादी जनतेसमोर ठेवली. राज्यातील पायाभूत सुविधा आणि वेगवेगळ्या योजनांचं काम कशापद्धतीने सुरू आहे हे देखील त्यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे यांनी राज्यातील तरुणांसाठी पोलीस भरती आणि इतर विभागातील 75 हजार पदे भरण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. पोलीस भरतीला आम्ही सुरुवात केली आहे. 20 हजार पोलीस शिपाईची पदे भरण्याची प्रकिया सुरु करण्यात आली आहे. तसेच राज्यातील विविध विभागातील 75 हजार पदांची भरती लवकरच करण्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. त्यामुळे तरुणांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. (Latest News)

आरोग्य सुविधांसाठी दुप्पट निधी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात 700 बाळासाहेब ठाकरे औषध केंद्र सुरु करणार आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित याउद्देशाने चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी सुरु केली आहे.

शेतकऱ्यांसाठी काय केलं?

शेतकऱ्यांना केलेल्या मदतीबाबत सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना एनडीआरएफ मदतीच्या दुप्पट आणि दोन हेक्टरऐवजी 3 हेक्टर मर्यादेमध्ये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. 30 लाख शेतकऱ्यांना 4 हजार कोटींची मदत, निकषात न बसणाऱ्या सततच्या पावसामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनाही 755 कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

भू विकास बँकेतून कर्ज घेणाऱ्या 35 हजार शेतकऱ्यांना 950 कोटींची कर्जमाफी सरकारने दिली. नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान, एकाच दिवशी 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अडीच हजार कोटी रुपये जमा केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahabharat: महाभारताचे पुरावे सापडले? कुरुक्षेत्रात सापडला रथ, महाकाय गदा?

Maharashtra Politics: सुजय विखेंनी दिले वडिलांना राजकारणाचे धडे,'विरोधकांपेक्षा गाडीत बसणाऱ्यांपासून सावध राहा'

Buldhana Crime: सकाळी-सकाळी डोकं फिरलं, सपासप कुऱ्हाडीने वार करत आई-बाबाला संपवलं; नंतर स्वतःला लावला फास

Maharashtra Politics: भाजप कुबड्या काढणार? भाजप अजितदादा-शिंदेंना रोखणार?

Maharashtra Live News Update: चंद्रकांत पाटील उद्या पुणे पोलीस आयुक्तांना भेटणार, कायदा व सुव्यवस्थेच्याबाबत घेणार आढावा

SCROLL FOR NEXT