eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

Dharavi News: मुख्यमंत्री धारावीत येणार! धारावी पुर्नविकास प्रकल्पाबाबत मोठ्या घोषणेची शक्यता

Dharavi Redevelopment Project News: आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी समजली जाणाऱ्या धारावीला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार आहेत.

सूरज सावंत

Mumbai Latest News: मुंबईतून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी समजली जाणाऱ्या धारावीला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथी निमित्त हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याच्या उद्घाटनासाठी एकनाथ शिंदे हे धारावीत येणार आहेत. (Eknath Shinde Latest News)

यावेळी धारावी पुर्नविकास प्रकल्पाबाबत मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. धारावी (Dharavi) पुर्नविकास प्रकल्पासाठी मागवलेल्या निवेदा प्रक्रियेत तीन विकासकांनी सहभाग घेतला आहे. यासाठी अदाणी ग्रुप, नमन ग्रुप आणि डीएलफ कंपनी अशी या विकासकांची नावे आहे. जवळपास ६०० एकरांवर लाखो नागरिकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. यासाठी जवळपास २३ हजार कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट असणार आहे. (Dharavi Redevelopment Project News)

MMRA अंतर्गत होणाऱ्या या पुर्नविकास प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे धारावीत जाणार असल्याचे कळते. या प्रकल्पासाठी निवेदा घेऊन आलेले विकासक पात्र आहेत का? याची तपासणी करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अपघातापूर्वी अजितदादांना शेवटचा कॉल कोणी आणि कशासाठी केला? नवी माहिती आली समोर

Maharashtra Live News Update: शिवजयंतीनिमित्त अलिबागमध्ये मिरवणूक, शिवरायांच्या जयजयकारात दुमदुमला परिसर

Mahayuti: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ, पुढील काही दिवसांत महायुती फुटणार?, कुठे पडली ठिणगी?

शेवटच्या एका तासात खेळ खल्लास! शेअर बाजारात फुटला आपटीबॉम्ब, गुंतवणूकदारांच्या गटांगळ्या, 700,000 कोटींचा चुराडा

Shikhar Dhawan: हार्दिक पंड्यानंतर आणखी एका क्रिकेटरचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो व्हायरल; लवकरच दुसरं लग्न करणार

SCROLL FOR NEXT