uddhav Thackeray and eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : विधानपरिषदेत शिंदे गटाला मोठा धक्का; कामकाज समितीत ठाकरे गटाचा समावेश

कामकाज सल्लागार समितीत ठाकरे गटाचा समावेश करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यात नवं सरकार स्थापन झालं तेव्हापासून एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray) अनेकदा विविध मुद्द्यांवरून आमने-सामने आलेला आहे. सत्तासंघर्षाचा हा वाद आता सुप्रीम कोर्टातही पोहचला आहे. खरी शिवसेना आपली असा दावा दोन्ही गटाकडून केला जातोय. अशातच विधानपरिषदेत शिंदे गटाला एक मोठा धक्का बसला आहे. कामकाज सल्लागार समितीत ठाकरे गटाचा समावेश करण्यात आला आहे. (Eknath Shinde Todays News)

विधानपरिषदेत शिंदे गट अस्तित्वातच नाहीये. यामुळे तिथे ठाकरे गटाचा समावेश करण्यात आला आहे. कामकाज समितीत ठाकरे गटाचे अंबादास दानवे आणि अनिल परब यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. एकीकडे विधानसभेत ठाकरे गटाला धक्का बसला असतानाच, आता दुसरीकडे विधानपरिषदेत शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत प्रवेश मिळवण्यावरून एकनाथ शिंदे यांचा गट हा ॲक्शन मोडवरती आला होता. यासाठी गटाकडून थेट विधानसभा अध्यक्षांनाच पत्र लिहण्यात आलं होतं. आपले प्रतिनिधी या गटात असावेत आणि या बैठकीत आपला सहभाग असावा असे मत आता शिंदे गटातील सदस्यांनीही व्यक्त केलं होतं. मात्र आता कामकाज समितीत ठाकरे गटातील दोन नेत्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. (Shivsena Todays News)

विशेष बाब म्हणजे शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहित दोन नाव सुचवली गेली होती. ती दोन नाव कोणती ही माहिती याची समोर आली नाही. दुसरीकडे ठाकरे गटाकडून अनिल परब आणि अंबादास दानवे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. आता ठाकरे गटाच्या शिफारसीवर शिक्कामोर्तब झाला असून विधानपरिषद कामकाज समितीत ठाकरे गटातील दोन नावांचा समावेश करण्यात आला आहे.

आहे, गेल्या काही दिवसात विधानसभा अध्यक्षांना अशा विविध मुद्द्यांवरून अनेक पत्र मिळालेली आहेत. मात्र यावेळेस पत्राची खासियत ही नवे विधानसभा अध्यक्षांची निवड झाल्यानंतर केलेल्या या हालचाली असल्याने हा निर्णय कोणाच्या बाजूने होणारी याकडेही संपूर्ण राज्यात व लक्ष लागलेलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Investment: आता NSE वर शेअर्सप्रमाणे खरेदी करू शकाल सोने; काय आहे EGR? जाणून घ्या फायदे-तोटे

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार, शिवसेनेतील बडा नेता नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

SCROLL FOR NEXT