Eknath Shinde vs Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Eknath Shinde : CM शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी; ठाकरे गटाने गोमूत्र शिंपडत केलं शुद्धीकरण

मुख्यमंत्री स्मृतीस्थळावरून जाताच तिकडे लगेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक आले. त्यांनी स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या (१७ नोव्हेंबर) दहावा स्मृतीदिन आहे. आज स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं. मुख्यमंत्री स्मृतीस्थळावरून जाताच तिकडे लगेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक आले. त्यांनी स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं. (Eknath Shinde Latest News)

यावेळी शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत देखील उपस्थित होते. गद्दारांमुळे बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ हे अपवित्र झाले आणि म्हणून तिथे गोमूत्र शिंपडून आम्ही ते पवित्र केले, असे म्हणत खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. तसेच आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या आणि मग त्यांच्याबद्दल बोला असाही टोला अरविंद सावंत यांनी लगावला.

उद्या म्हणजेच 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा 10 वा स्मृतीदिन आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बाळासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला.

'बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या दहावा स्मृतीदिन आहे. त्याच्या पूर्वसंध्येला आम्ही त्यांना अभिवादन करायला आलोय. हिंदुत्ववादी विचारांच्या कार्यकर्त्याला बाळासाहेबांच्या आठवणीशिवाय एक क्षणही जाणार नाही. ही वस्तूस्थिती आहे', अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

'बाळासाहेबांचं स्मारक सरकारने ताब्यात घ्यावं'

 दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविषयी भाजप आमदाराने एक मोठी मागणी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक राज्य सरकारने ताब्यात घ्यावं, अशी मागणी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. इतकंच नाही तर, स्मारकाच्या देखभालीसाठी समिती स्थापन करून ठाकरे कुटुंबातील एखाद्या सदस्याची नेमणूक करावी, असा सल्लाही प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी दिला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अपघातापूर्वी अजितदादांना शेवटचा कॉल कोणी आणि कशासाठी केला? नवी माहिती आली समोर

Maharashtra Live News Update: शिवजयंतीनिमित्त अलिबागमध्ये मिरवणूक, शिवरायांच्या जयजयकारात दुमदुमला परिसर

Mahayuti: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ, पुढील काही दिवसांत महायुती फुटणार?, कुठे पडली ठिणगी?

शेवटच्या एका तासात खेळ खल्लास! शेअर बाजारात फुटला आपटीबॉम्ब, गुंतवणूकदारांच्या गटांगळ्या, 700,000 कोटींचा चुराडा

Shikhar Dhawan: हार्दिक पंड्यानंतर आणखी एका क्रिकेटरचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो व्हायरल; लवकरच दुसरं लग्न करणार

SCROLL FOR NEXT