Sharad Pawar Meets Cm Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar Meets Cm Eknath Shinde: पवार-शिंदे यांच्या भेटीमागचं कारण काय? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं...

पवार-शिंदे यांच्या भेटीमागचं कारण काय? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sharad Pawar Meets Cm Eknath Shinde: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदा शरद पवार हे वर्षा निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.

पवार आणि शिंदे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. आता याच चर्चांना मुख्यमंत्री शिंदे यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी या भेटीमागे नेमकं काय कारण आहे, याबाबत माहिती दिली आहे.

पवार-शिंदे भेटीमागचं नेमकं कारण काय?

शरद पवार यांच्या भेटीमागचं कारण सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं. ते म्हणाले आहेत की, ''या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. ही सदिच्छा भेट होती.'' मराठा मंदिर संस्थेला ७५ वर्ष पूर्ण झाली असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पवार यांनी निमंत्रण दिलं, असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे परदेशात शरद पवार वर्षावर

मुख्यमंत्री शिंदे यांनी जरी या भेटीमागचं कारण स्पष्ट केलं असलं तरी याचे अद्यापही अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे परदेशात असतांना शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांच्या भेटीला गेले आहेत.

याबाबत बोलताना भाजप नेते राम कदम यांनी बोलतांना सांगितलं की, यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. एका पक्षाचा प्रमुख राज्याच्या प्रमुखाच्या भेटीला गेला आहे. त्यामुळे यातून दुसरा काहीही अर्थ नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Struggle: प्रसिद्ध अभिनेत्यावर आली बिकट वेळ; एकेकाळी पडद्यावर गाजला, आता रस्त्यावर विकतोय भाजी

चहाप्रेमींना मोठा झटका! साखर महागली अन् चहा कडवटला; कटिंगच्या कपाला दुप्पट भाव

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; RSS आणि पक्षावर कोसळला दु:खाचा डोंगर, राजकीय वर्तुळात हळहळ

श्रावणात अळूची भाजी का खावी? जाणून घ्या अळूच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Update: भिवंडी बायपासजवळ चोरीच्या उद्देशाने ट्रक चालकाची हत्या; १५० सीसीटीव्हीच्या मदतीने दोघांना अटक

SCROLL FOR NEXT