CM Eknath Shinde, PM Narendra Modi SAAM TV
मुंबई/पुणे

...म्हणून मला मोदी-शहांनी मुख्यमंत्रिपदाची संधी दिली; CM शिंदेंनी सांगितलं नेमकं कारण

PM मोदी आणि अमित शहा यांनी मुख्यमंत्रिपदी संधी का दिली? या प्रश्नाचं उत्तर स्वतः एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिलं.

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

CM Eknath Shinde News : एकनाथ शिंदे यांनी 'उठाव' केल्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. शिंदेंसोबत शिवसेनेतून ४० आमदार बाहेर पडले. भाजप आणि शिंदे गट यांच्यात युती होऊन राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार आलं. त्यानंतर मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले. तर देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. शिंदेंना मुख्यमंत्री केल्यानंतर अनेकांना याबाबत प्रश्न पडला होता. पण आता या प्रश्नाचं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकं उत्तर दिलं आहे.

हा एक जोरदार आणि धाडसी माणूस दिसतोय असं माझ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वाटले. त्यामुळे त्यांनी मला मुख्यमंत्रिपदाची संधी दिली, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ठाण्यात महापालिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शिंदे बोलत होते. (Maharashtra Politics News)

ठाणे महापालिकेच्या वतीने ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या संकल्पनेचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सुरूवातीला मुख्यमंत्री कोण होईल अशी चिंता होती. परंतु हा एक जोरदार, धाडसी माणूस दिसतोय असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना माझ्याबद्दल वाटले. त्यामुळे त्यांनी मला मुख्यमंत्रिपदाची संधी दिली, असे शिंदे यांनी सांगितले. (Eknath Shinde)

शिंदे यांनी ठाण्याविषयी आपुलकीही व्यक्त केली. मी जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी ठाण्यात घरी आल्यानंतर शांत झोप लागते, असेही ते म्हणाले. ठाण्यात सुशोभिकरणाची कामे सुरू असून येत्या सहा महिन्यांत ठाणे खड्डेमुक्त, कचरामु्क्त करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. इतर योजनांच्या बाबतीत माहिती देत असताना त्यांनी भविष्यात शहरातील प्रकल्पाच्या बाबतीत अधिकारीवर्गाला सूचना दिल्या. आरोग्याच्या बाबतीत देखील त्यांनी अधिकारीवर्गाला सूचना दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळे तालुक्यातील आदिवासी बांधवांचे तलावात उतरून आंदोलन

Congress Protest Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सर्वोच्च न्यायालयातून बाहेर

Late night sleeping: रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती? रात्री जागणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे

देशातील हा दुसरा स्वातंत्र्य लढा; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी असं का म्हणाले?

Nagpur Fort : नागपूरजवळ लपलाय ३०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा, कैद्यांसाठी तुरुंग बनलेला विदर्भातील 'हा' किल्ला पाहिलात का?

SCROLL FOR NEXT