Eknath shinde
Eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

Video| ... तर एवढा कार्यक्रम केला असता का ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर हल्लाबोल

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

Eknath Shinde News : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला १७ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. १७ आणि १८ ऑगस्ट रोजी दोन दिवस सभागृहाचं कामकाज चालल्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्या. त्यानंतर आजच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याच्या निर्णयावर भाष्य केले.

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रश्नाला जोरदार प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्री म्हणाले, 'थेट नगराध्यक्ष करावा, असा निर्णय २००६ साली घेतला. असे निर्णय आताच आपण बदलला असे नाही. नगरविकास मंत्र्याने निर्णय घेतला, तो एका मंत्र्यांचा निर्णय नसतो, तो सर्व मंत्र्यांचा असतो. अजित पवार तुम्ही भाषण करताना तोंडातून निघत होते, जनतेतून निवडून द्या. तुम्ही म्हणता तसे कोण संपूर्ण शहरात दादागिरी करू शकतो का ? जितेंद्र आव्हाड तुम्ही मुंब्र्यात करू शकतात, पण संपूर्ण शहरात करू शकता का ? असे अनेक नगराध्यक्ष आहेत, त्यांनी चांगले काम केलेले आहेत'.

'आपण तिघे जण दिल्लीला गेलो होतो. तेव्हा मला भुजबळ म्हणाले, अरे एकनाथ सर्व ओके होते ना, अजित पवारांना देखील हे माहीत होते. मघाशी नितेश राणे यांनी देखील उल्लेख केला आहे, त्यावर मी भाष्य करणार नाही. प्राजक्त तनपुरे यांना सर्वात जास्त निधी देणारा मी आहे. जयंत पाटील यांनी सांगितला म्हणून दिला, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'आपण घटनेप्रमाणे कामकाज करत आहोत. जो चुकीचा कारभार करेल, त्यावर कारवाई केली जाईल. भास्कर जाधव यांनी पूर्ण नगरविकास वाचून दाखविला. ९ हजार ग्रामपंचायत यांनी सरपंच थेट जनतेतून निवडा. आमचा स्वत:चा अजेंडा काहीच नाही, जे जनता म्हणेल ते करणार. 'देवेंद्र और मै है साथ साथ, मेरा भी नाम है एकनाथ' असे म्हणत जर मी सक्षम नसतो, तर एवढा कार्यक्रम केला असता का ?'

'अजित दादा म्हणाले, तू आधीच कानात सांगितले असते तर, पण दादा ते ऐकत नव्हते, म्हणून तर असे केलं ना. काही लोक बाहेर फक्त एकच शब्द म्हणतात. काही लोक म्हणतात 'ताट वाटी, चलो गुवाहाटी'. तर त्यात धनंजय मुंडे एवढे घोषणा देत होते, जसे काय ते जुने शिवसैनिक आहे. धनंजय मुंडे यांच्यावर तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी प्रेम करुणा सर्व दाखवले. पण आता दाखवता येत नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी जोरदार टीका केली.

ठाकरे सरकारच्या ४०० जीआर रद्द करण्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'आम्ही पत्र दिले तेव्हा सरकार अल्पमतात आले होते. तरी तेव्हा ४०० जीआर काढले. त्यामळे ते जीआर कसे काय रद्द करणार नाही'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tata आणि Citroen च्या दोन नवीन कार ऑगस्टमध्ये होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

405 लिटरची बूट स्पेस, 19 Kmpl मायलेज, जबरदस्त आहे Renault ची ही 5 Seater Car

Desi Jugad Viral Video: जबरदस्त देसी जुगाड! कारमध्येच लावली ऊसाच्या रसाची मशीन, VIDEO ची होतेय चर्चा

Viral Video: स्केटिंग करताना हिरोगिरी करणं पडलं महागात, तरुणाचे झाले असे हाल; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

kalyan Crime News : लग्नाला दिलेला नकार पोराला पचला नाही, रागाच्या भरात नको ते करून बसला!

SCROLL FOR NEXT