CM Eknath Shinde  Saam Digital
मुंबई/पुणे

Eknath Shinde : राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शब्द, लाडक्या बहि‍णींचाही केला उल्लेख, VIDEO

CM Eknath Shinde Latest News : माध्यमांसोबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा शब्द दिल असून लाडक्या बहिणींचाही उल्लेख केलाय.

Satish Daud

राज्यातील काही भागात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालंय. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिके पाण्यात वाहून गेल्याने बळीराजाला अश्रू अनावर झालेत. अशातच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचा शब्द दिला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीभातीचं नुकसान झालं आहे. पण सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. सगळी मदत केली जाईल, असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानी आज शनिवारी दुपारी गणपती बाप्पाचे आगमन झाले. यावेळी संपूर्ण शिंदे कुटुंबीय उपस्थित होते. गणरायाची आरती केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेवर महत्वाचे भाष्य केले.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

राज्यातल्या सर्व नागरिकांना आणि गणेशभक्तांना मी गणेशोसत्वानिमित्त शुभेच्छा देतो. गणरायाचं आगमन झालंय. आपल्या आयुष्यात पण आनंद, समाधान, समृद्धी येवो. सर्वांना सुबुद्धी मिळो हीच प्रार्थना. गणेशोत्सव काळात (Ganeshotsav 2024) महाराष्ट्राच्याच नाही तर देशात आणि विदेशातही मराठी माणसांत उत्साह-जोश दिसतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

यंदा राज्यात सगळीकडे खूप चांगला पाऊसही झाला आहे, त्यामुळं शेतकरी बांधवामध्येही उत्साह आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीभातीचं नुकसान झालं आहे. पण सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना सगळी मदत केली जाईल, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला.

महायुती हे सर्वसामान्यांच्या हिताचं सरकार असून आम्ही अनेक चांगल्या सामाजिक योजना सुरू केल्या आहेत. देशपातळीवर त्याचं कौतुक होतंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारखी योजना म्हणजे राज्यातल्या भगिनींच्या आयुष्यात क्रांती आणणारी योजना ठरत आहे. या बहिणींचे आशीर्वादही आम्हाला मिळत आहेत, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

परदेशी गुंतवणूक राज्यात मोठ्या प्रमाणावर येत आहे. देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा एक ट्रिलियन डॉलर्सचा वाटा असणार आहे. गणेशाच्या कृपेनं आम्ही राज्यातल्या गोरगरीब, दुर्बल आणि गरजू लोकांसाठी आणखीही चांगल्या योजना आणून त्यांची अंमलबजावणी करू, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : शेकाप ही भाजपची 'बी' टीम; संजय राऊत यांची शेकाप उमेदवार टीका

Pune News: पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी PMPMLच्या वाहतुकीमध्ये बदल, असा कराल प्रवास

Maharashtra News Live Updates: सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

SCROLL FOR NEXT