CM Eknath Shinde Meet Governor Ramesh Bais Saam TV
मुंबई/पुणे

Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला; काय आहे कारण?

CM Eknath Shinde Meet Governor Ramesh Bais: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीला गेले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

CM Eknath Shinde Meet Governor Ramesh Bais: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीला गेले आहेत. मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक राजभवनावर गेल्याने त्यांच्या भेटीकडे राजकीय अर्थाने बघितलं जात आहे.

आजच्या भेटीत राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये महत्वाची बैठक होण्याची शक्यता असून महाराष्ट्रात सुरू असलेलं राजकारणावर चर्चा होऊ शकते. दरम्यान, राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही भेट स्नेहभोजनानिमित्त असल्याचंही बोललं जातंय.

राज्यपाल भवनावर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सुद्धा उपस्थित असल्याची माहिती आहे.राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. पक्षातलं महत्त्व अधोरेखित करणं, अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्यांना खिळ लावणे यासह बरेच अर्थ काढले जात आहेत.

त्यामुळे आज अचानकपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीला गेल्याने राजकीय उलथापालथ होऊ शकते, असं राजकीय जाणकार सांगत आहेत. महत्त्वाचं म्हणजे ही भेट आधीच ठरल्याचं शिवसेना नेत्या शितल म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआच्या एकीवर ठाकरेंचे प्रश्नचिन्ह ; मविआच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT