eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

'जनतेत जाण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही'; धमकी मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री नव्हतो तेव्हा देखील मला धमक्या अनेक वेळा धमक्या आल्या होत्या. जनतेत जाण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Vishal Gangurde

Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. गुप्तचर विभागाला ही माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी (Police) योग्य ती खबरदारी घेतली आहे. या धमकी प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'धमक्यांना मी घाबरत नाही. मुख्यमंत्री नव्हतो तेव्हा देखील मला अनेक वेळा धमक्या आल्या होत्या. जनतेत जाण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गुप्तचर विभागाला सदर माहिती मिळाली. मुख्यमंत्र्यांना धमकी मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही महिन्यांपूर्वी देखील जिवे मारण्याची धमकी मिळाली होती. या धमकी प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'धमक्यांना मी घाबरत नाही. मुख्यमंत्री नव्हतो, त्यावेळी देखील धमक्या आल्या होत्या. त्या धमक्यांचा परिणाम होत नाही. जनतेत जाण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही. त्यामुळे त्याच्यावर लक्ष देखील देत नाही. या प्रकरणात पोलीस काम करत आहेत. तसेच गृहविभाग या प्रकरणात काम करत आहे'.

'याआधी देखील नक्षलवाद्यांच्या धमक्या आल्या आहेत. काही देश विघातक शक्तींनी प्रयत्न केला आहे. ज्यावेळी मी मुख्यमंत्री नव्हतो. त्यामुळे माझ्यासाठी नवीन नाहीये, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

SCROLL FOR NEXT