eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

कोर्टाच्या निकालानंतर शिंदे गटाला मोठा धक्का; 'या' मैदानात मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार

शिवसेनेच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे होणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

भूषण शिंदे

Eknath Shinde News : शिवसेनेच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे होणार आहेत. एक दसरा मेळावा हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाचा आणि दुसरा दसरा मेळावा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा होणार आहे. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने शिवाजी पार्क तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने बीकेसीमधील एमएमआरडीए मैदानात दसरा मेळाव्यासाठी तयारी केली आहे. (Ekanath Shinde News In Marathi )

काल शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा करण्याची परवानगी दिली. बीकेसीमधील एमएमआरडीए मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली होती. त्याच मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बीकेसीमधील एमएमआरडीए मैदानात मैदानात मोठी तयारी सुरू केली आहे.

चार जेसीबी कामाला लावून मैदानाची साफसफाई करणे असेल किंवा जमीन समांतर करणे असेल अशी तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या दसरा मेळाव्यात काय बोलणार आणि कोणते आरोप-प्रत्यारोप होणार या सर्व राजकीय घडामोडींचा हे बीकेसीमधील एमएमआरडीए मैदान साक्षीदार असणार आहे. तेव्हा याच मैदानातून सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला आहे.

शिवाजी पार्कसाठी एकनाथ शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव

दसरा मेळावा घ्यायची परवानगी मिळावी यासाठी शिंदे गटाने केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जरी शिवसेनेला शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली असली तरी ठाकरे गटासमोरील अडचणींमध्ये काही कमी झालेली दिसतं नाहीये.

कारण उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत शिंदे गट आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करणार आहे. सोमवारी शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात गेलेल्यावर शिंदे गटाला दिलासा मिळणार की उच्च न्यायालयाचा निकाल जैसे थे राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam: गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? सावली वरुन परबांनी कदमांना घेरलं

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

Devendra Fadnavis: बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही; फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना इशारा

Horrific Accident : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित! बाईक अडवल्याने तरुणांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

SCROLL FOR NEXT