CM Eknath Shinde Speech Saam TV
मुंबई/पुणे

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली विशेष अधिवेशनाआधीच मोठी घोषणा

CM Eknath Shinde Speech : शिवनेरी किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं भाष्य केलं आहे.

प्रविण वाकचौरे

Pune News :

मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अधिसूचनेनंतर उद्या (२० फेब्रुवारी) विधानसभेचं विशेष अधिवेशन पार पडणार आहे. उद्याच्या अधिवेशेनात मराठा आरक्षणाबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्याआधी शिवनेरी किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी मोठं भाष्य केलं आहे.

उद्या विशेष अधिवेशन बोलावलं आहे.यात टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीतलं मराठा आरक्षण देण्यासंदर्भात आणि कुठल्याही समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण मिळेल. सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारं हे सरकार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक ठराव होईल- सुनील तटकरे

उद्या मराठा आरक्षण संदर्भात विशेष आरक्षण सुरू होत आहे. मागील 2 वेळा आरक्षण देण्यात आलं पण ते टिकू शकलं नाही. त्यावेळी ज्या त्रुटी सर्वोच्च न्यायालयाने निदर्शनास आणून दिल्या त्यांची दुरुस्ती करून उद्याचे विधेयक सादर होईल, असे मला वाटतं. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक ठराव होईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं.

मनोज जरांगेंचा इशारा

'सगेसोयरें'बाबत २० फेब्रुवारीला अंमलबजावणी केली नाही, तर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू. जर सगेसोयरेंबाबत भूमिका स्पष्ट झाली नाहीतर लगेच आंदोलनाची घोषणा करणार आहोत. त्यानंतर २१ तारखेला नियोजनबद्ध आंदोलनची दिशा ठरवली जाणार आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Coastal Road: वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडचे काम वेगात; १० ठिकाणी इंटरचेंज; वाचा कुठून कसा असणार?

Maharashtra News Live Update: कल्पना खरात अटकपूर्व जामीन प्रकरण तहकूब

Maternal Sepsis: गर्भधारणेनंतरचा संसर्ग ठरू शकतो जीवघेणा, मॅटर्नल सेप्सिसबाबत महिलांनी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Makeup Side Effects : मेकअप करायला खूप आवडतो? मग शरीरावर होणारे 'हे' गंभीर दुष्परिणाम वाचून बसेल धक्का

आसाममध्ये पुन्हा NDA सरकार; हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली दुसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ,VIDEO

SCROLL FOR NEXT