Devendra Fadnavis  Saam tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis : मराठीला कोणी कमी लेखत असेल तर सहन करणार नाही; CM फडणवीसांनी दुजाभाव करणाऱ्यांना सुनावलं

CM Devendra Fadnavis news : राज्यात मराठी भाषेला कोणी कमी लेखत असेल तर सहन करणार नाही, असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. सकाळ सन्मान सोहळ्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Vishal Gangurde

मुंबई : मुंबई, पुण्यासारख्या शहरात मागील काही वर्षात मराठी भाषिकांशी दुजाभाव झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईतही काही भागात मराठी भाषिकांना घर नाकारल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यातील विविध भागात मराठी भाषिकांचा अपमान झाल्याच्या प्रकारानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. मराठी भाषिकांशी झालेल्या दुजाभावावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा इशारा दिला आहे. 'मराठीला कोणी कमी लेखत असेल तर सहन करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळ सन्मान सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी मराठीच्या मुद्द्यांवरही फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'भारताच्या संविधानात कोणालाही व्यक्तीचे हक्क नाकारण्याचा अधिकार नाही. व्यवहार आणि परंपरेसाठी एकत्र येण्याचा अधिकार आहे. कोणावर कुठे अन्याय होत असेल, तर सरकार त्यावर भूमिका घेईल. भाषा संवादाचं माध्यम आहे. मला मराठी भाषा प्रिय आहे. पण दुसरी भाषा अप्रिय असं नाही. मराठी भाषेला कोणी कमी लेखत असेल, तर सहन करणार नाही'.

सरकारी कार्यालयात मराठी भाषा बंधनकारक करण्यात आली आहे. यावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'आपली भाषा आपण वापरली नाही, तर कोणी वापरणार नाही. मराठी भाषेला व्यवहार भाषा करायची असेल, तर ते भाषा व्यवहारात आणली पाहिजे. अधिकाऱ्यांनी इंग्रजीत लिहायचं, त्यानंतर आम्ही त्यावर सही करायची. भाषेचा वापर कमी झाल्याने भाषा संपते'.

'जर्मनीत जर्मन भाषा वापरली जाते. चीनमध्ये इंटरनेट चिनी भाषेत वापरली जाते. भाषा जिवंत करण्यासाठी संधी आली आहे. कृत्रिम बुद्धिमतेमुळे ही संधी चालून आली आहे. आज आपण तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Silver Gift : सोने की चांदी? आवडत्या व्यक्तीला काय देणं शुभ ठरेल?

Monsoon Health Care: पावसाळ्यात रात्री झोपल्यावर कानात घोण शिरला तर? घाबरु नका 'या' ७ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

IMD Weather Update: १३ राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात शुक्रवारी कसं असेल हवामान, पाहा अपडेट

Maharashtra News Live Update: खेडमध्ये अतिवृष्टीचा हाहाकार; तिघांचा मृत्यू, एक जण बेपत्ता

Khopoli Hill Station : पावसाळी पिकनिकसाठी परफेक्ट! खोपोलीपासून हाकेच्या अंतरावर वसलंय स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशन

SCROLL FOR NEXT