Devendra Fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis : विरोधकांच्या मराठीतील पत्रात व्याकरणाच्या २४ चुका; हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadnavis latest news : महायुतीच्या पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. यावेळी फडणवीसांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं.

Vishal Gangurde

हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय. महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. या अधिवेशनच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घालत हिंदी सक्तीवरून टीका केली आहे. विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीनेही पत्रही जारी केलं. मात्र, विरोधकांच्या पत्रात व्याकरणाच्या २४ चुका असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महायुती सरकारची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीका केली. फडणवीस म्हणाले, '१४ सप्टेंबर २०२१ रोजी हा अहवाल सादर झाला. त्यानंतर मंत्रिमंडळापुढे आणला गेला. त्या इतिवृत्तावर उद्धव ठाकरे यांची सही आहे. कॅबिनेटच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंची सही आहे. यात कुठेही हा अहवाल स्वीकारताना निर्णय मान्य नसल्याचे कुठेही म्हटलेलं नाही. यात काहीच नाही. यात तिसरी भाषेच्या गुणामुळे पुढील इयत्तेत प्रवेश मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील. त्यासाठी या निर्णयाला मान्यता देण्यात आली होती.'

'आजच्या पत्रकार परिषदेला भास्कर जाधव दिसले नाहीत. आजच्या सह्या ५-३-२ आहेत. वडेट्टीवारांना वाटतंय की, उद्धव ठाकरेच अद्याप मुख्यमंत्री असल्याचे वाटत आहे. त्याहीपेक्षा जितेंद्र आव्हाडांनी बोफोर्स घोटाळ्याची आठवण काढली. जितेंद्र आव्हाडांनी बोफोर्सवरून घरचा आहेर दिला. विरोधकांच्या पत्रकार परिषदेत नाविन्यता दिसली नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.

शासनाचे दोन्ही जीआर रद्द

दरम्यान, हिंदी सक्तीबाबचे दोन्ही शासन निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी रद्द केले आहेत. त्यानंतर नवी समिती नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली जाणार आहे. या समितीचा निर्णय आल्यानंतर घेणार असल्याचे फडणवीसांनी म्हटलं आहे. हिंदी भाषा ऐच्छिक असून मराठी अनिवार्य असल्याचे भाष्य फडणवीसांनी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

Kitchen Hacks : पितळ आणि तांब्याच्या भांड्यांचा काळपटपणा जात नाहीये? 'या' ट्रिक्स वापरून होतील लख्ख

Fort : किल्ल्यात दडलाय सोन्याचा खजिना? रहस्य शोधण्यासाठी आजही पर्यटकांची गर्दी

SCROLL FOR NEXT