मोठी बातमी: मुंबईकरांना भेट... 500 स्केवर फूटांपर्यंत घरांना कर माफ Saam Tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी: मुंबईकरांना भेट... 500 स्केवर फूटांपर्यंत घरांना कर माफ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षाचे स्वागत करत असताना जनतेला मोठे गिफ्ट दिले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षाचे स्वागत करत असताना जनतेला (public) मोठे गिफ्ट दिले आहे, शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज पहिल्यांदा जनतेसमोर लाईव्ह आले होते. नगरविकास खात्याची आज मुख्यमंत्र्यांच्या (CM) उपस्थितीमध्ये ऑनलाईन (Online) बैठक होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५०० चौरसफुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे.

५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करामध्ये माफी दिल्याने आता महापालिकेचा (Municipal Corporation) दरवर्षी ३४० कोटींचा कर आता बुडणार आहे. मुंबईत (Mumbai) ५०० चौरस फुटांचे जवळपास १५ लाख घरे आहेत. ज्यामध्ये २८ लाख कुटुंब (Family) राहत आहेत. या कुटुंबांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे मुंबईकरांना नव्या वर्षात हे मोठे गिफ्ट मिळाणार आहे.

हे देखील पहा-

मुंबईकर सांगितले की मुंबईकरांनी फक्त करच भरायचे का? मुंबईकर अगोदरच कर मोठ्या प्रमाणात देत आहेत, त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांनी (Shiv Sena) मुंबईवर जे प्रेम केले तेच प्रेम आम्ही पुढे नेत आहोत, आता माझ्या ताण आदित्य ठाकरेंनी कमी केला आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत. शिवसैनिकांनी दिलेली वचने पाळायला शिकवले आहे. त्यामुळे आम्ही वचन देतो आणि ते पाळतो, लोकांना निवडणुकीमध्ये दिलेली बरीच वचने पूर्ण केली आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांनी यावेळी सांगितले आहे.

या निर्णयामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. मंदीच्या लाटेमध्ये अर्थव्यवस्था कोलमडली असताना रिअल इस्टेटला देखील महाराष्ट्र सरकारने दिला आहे, कोणी किती काही सांगितले तरी, त्या त्यांच्या गोष्टया आहेत. कोरोना काळातही आपण विकासाला कात्री लावली नाही, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत. शिवसेना वचनाला जागते हे ब्रीदवाक्य कायम आहे. यामुळे लोकांमध्ये मोठा मेसेज जाणार आहे, निवडणुका असो किंवा नसो आम्ही सतत काम करत राहणार आहे. त्यामुळे मुंबईतला प्रत्येक माणूस शिवसेनेच्या पाठिमागे उभा राहिला आहे, असे यावेळी त्यांनी म्हणाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT