मुख्यमंत्री आणि शरद पवारांनी अनिल देशमुखांना लपवने बंद करावे - किरीट सोमय्या SaamTV
मुंबई/पुणे

मुख्यमंत्री आणि शरद पवारांनी अनिल देशमुखांना लपवने बंद करावे - किरीट सोमय्या

उद्धव ठाकरेंना माझे खुले आव्हान, मी घोटाळा केल्या असेल तर मला अटक करा.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : मी कोल्हापूरला जाऊन आलो त्याची माहीती मा. राज्यपालांची Governor भेट घेऊन हसन मुश्रीफ Hassan Mushrif यांच्या घोटाळ्या संदर्भातील सर्व माहिती दिली आहे. हसन मुश्रीफ यांच्या विरोधात राज्यपालांकडे तक्रार देखील केली आहे असून मी उद्या दिल्लीला जाणार असल्याच किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. (CM and Sharad Pawar should stop hiding Anil Deshmukh - Kirit Somaiya)

राज्यातील पोलीसांनी Police १९ सप्टेंबरला उद्धव ठाकरे याचे माफिया म्हणून जे काम केलं याची मानवाधिकार आयोगात Human Rights Commission तक्रार करणार असल्याचही ते म्हणाले पोलिसांचा गुंड म्हणून उपयोग करत मला घरात डांबून ठेवलं. भावना गवळी यांनी १०० कोटीचा घोटाळा केला आहे. भावना गवळींनी स्वतः ७ कोटींची चोरी केली असून साडे १८ कोटी लंपास केले आहेत पतसंस्थेच्या बोगस एन्ट्री करवून घेतल्या आहेत. मात्र पोलिसांनी सामान्य नागरिकांच्या विरोधातच तक्रार दाखल केली. गवळींच्या संस्थेत बोगस नोंदी आहेत असे आरोपही त्यांनी भावना गवळींवरती केले. उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांना घोटाळा करणाऱ्या लोकांना पाठीशी घालत आहेत त्यांनी भावना गवळींना Bhavna Gawali अटक करावी अशी मी मागणी करत आहे. असे सांगतानाच त्यांनी आपल्यावरती झालेला हल्ला हा भावना गवळी आणि सईद खान Saeed Khan यांनी केला असल्याची माहीती यावेळी दिली.

दरम्यान शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुख यांना वाचविण्याचे काम सोडावे शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांनी अनिल देशमुख यांना लपवणे बंद करावे असे आरोप पवार आणि ठाकरें वरती केले आहेत.

मुश्रीफ यांनी स्वतः चा जावई यांना कंत्राट दिले. हसन मुश्रीफ यांनी १५०० कोटी चा ग्रामविकास खात्यात घोटाळा केला आहे. त्यांनी स्वतः च्याच जावयाला अवैद्यरित्या कंत्राट दिले आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. मुश्रीफांची पहिली नोटीस मला मिळाली आहे पण मी घाबरत नाही, त्यांचे आणखी घोटाळे बाहेर काढणार अशा किती हि मला नोटीस पाठवा, मी घाबरणार नाही असे आव्हानच त्यांनी यावेळी मुश्रीफ आणि उद्धव ठाकरेंना दिलं आहे. 'उद्धव ठाकरेंना माझे खुले आव्हान आहे की, मी जर घोटाळा केल्या असेल तर मला अटक करा.'

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT