CM Eknath Shinde Pratap Sarnaik
CM Eknath Shinde Pratap Sarnaik Saam TV
मुंबई/पुणे

CM शिंदे आणि प्रताप सरनाईकांमध्ये जोरदार भांडण? सूत्रांची साम टिव्हीला माहिती

साम टिव्ही ब्युरो

Eknath Shinde And Pratap Sarnaik : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्याच गटातील आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली असल्याची माहिती सूत्रांनी साम टिव्हीला दिली आहे. ओवळा-माजीवाडा मतदारसंघामधून दोघांमध्ये वितृष्ट निर्माण झाली असल्याची माहिती मिळतेय. (CM Eknath Shinde vs Pratap Sarnaik Latest News)

प्रताप सरनाईक यांनी ओवळा-माजीवाडा मतदारसंघ भाजपच्या माजी आमदाराकरिता सोडावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रयत्नशील असल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर शिंदेंनी प्रताप सरनाईक यांच्यावर दबाव देखील टाकण्यास सुरूवात केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. शिंदेंची ही मागणी सरनाईकांना मान्य नसल्याने दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली असल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

धक्कादायक बाब म्हणजे नुकतेच प्रताप सरनाईक हे ईडीच्या ताब्यातून सुटले असं वाटत असताना, त्यांना पुन्हा एकदा ईडी चौकशीचा इशारा देण्यात आल्याचं सुद्धा वृत्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरनाईक यांचा ओवळा माजीवाड़ा मतदार संघ भाजपच्या माजी आमदाराला देण्यासाठी शिंदे प्रयत्नशील आहेत. त्यासाठी सरनाईक यांच्या निकटवर्तीयांना फोडण्यासाठी विविध आमिषे दाखवली जात आहेत. (Maharashtra News)

प्रताप सरनाईक यांना ही बाब कळताच, त्यांनी थेट शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जाब विचारला. दोघांमध्ये यावेळी शाब्दिक चकमक देखील उडाल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारलं. एकेकाळचे शिंदे यांचे कट्टर विरोधक प्रताप सरनाईक या बंडात आघाडीवर होते.

विविध प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव वाढल्याने सरनाईक शिंदे सोबत गेल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर दोघेही अनेकदा एकाच मंचावर दिसून आले. त्यांच्यात सगळं काही आलबेल असल्याची चर्चा सुरू असतानाच, दोघांमधील वाद पुन्हा उफाळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: डायबिटीजच्या रुग्णांनी अशापद्धतीने खावा भात, नाही वाढणार शुगर लेव्हल

Kangana Ranaut : ५ कोटींचे दागिने अन् महागड्या अलिशान कार; संपत्ती वाचून डोळे फिरतील

Skincare Tips: चमकदार त्वचेसाठी 'हे' टिप्स करा फॉलो

Today's Marathi News Live : माझ्यासोबत जे झालं ते खूप वाईट होतं; स्वाती मालीवाल यांनी दिली पोलिसांना त्या घटनेविषयी माहिती

Adah Sharma : ‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्मा हिच्या हटके अदा; फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT