tarapur , cisf jawan , Tarapur Nuclear Power Plant News , saam tv
मुंबई/पुणे

CISF Jawan : तीस जिवंत काडतुसांसह जवान गायब (पाहा व्हिडिओ)

पोलीस यादव याचा शोध घेताहेत.

रुपेश पाटील

Tarapur Nuclear Power Plant News : देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या तारापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि भाभा अणुशक्ती केंद्रात सुरक्षारक्षक असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा जवान रायफल आणि तीस जिवंत काडतुसांसह (bullets) काल पासून बेपत्ता आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मनोज यादव असं या सीआयएसएफच्या जवानाचं नाव आहे. तो काल पासून गायब असल्याची माहिती समोर आली आहे. मनोज यादव काल सकाळी कामावर हजर झाला मात्र त्या नंतर तो अचानक ऑन ड्युटीवरुन गायब झाला. या जवानाजवळ एलएमजी रायफल आणि तीस जिवंत काडतुसं आहेत.

यादव याचा शोध घेतला जातोय . काल दिवसभर शस्त्रास्त्रांसह अचानक गायब असलेला सीआयएसएफचा जवान पुन्हा कामावर रुजू होईल असं स्थानिक सीआयएसएफच्या कर्मचारी आणि अधिकारी यांना वाटत होते. मात्र तो आज ही न परतल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणी तारापूर पोलीस (police) ठाण्यात तक्रार नाेंदविण्यात आली आहे. पोलीस यादव याचा शोध घेताहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केजरीवालांच्या आपमध्ये फूट, राघव चड्डांसह 3 खासदारांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

Mithila Palkar: परी म्हणू की सुंदरा...; मिथिला पालकरचा हटके स्वॅग

Panvel Tourism: अवघ्या १०० रूपयांत फिरा पनवेलमधील ही ठिकाणे, विकेंडला येईल फुल टू मज्जा

Pune News: अंगावर घसरगुंडी कोसळून चिमुकलीचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर सोडले प्राण; पुण्यात खळबळ

Maharashtra News Live Update: भोंदूबाबाला अटक झाल्याच्या दिवशीच, पत्नीच्या नावावर जमीन; व्यवहारावर संशय

SCROLL FOR NEXT