CIDCO Lottery 2025 Saam Tv
मुंबई/पुणे

CIDCO Lottery 2025: नवी मुंबईत सिडकोचं घर फक्त २५ लाखांत, इतर उत्पन्न गटात किती रुपयांना आणि कुठे घर मिळणार?

CIDCO Lottery Homes Prices: सिडकोच्या २६००० घरांच्या किमती नुकताच जाहीर झाल्या. २५ लाख ते ९७ लाखांपर्यंत हे घर मिळणार आहे. ही घरं कुठे असणार आहेत आणि त्यांच्या किमती किती आहेत हे घ्या जाणून..

Priya More

नवी मुंबईमध्ये हक्काचे घर असावे यासाठी घर घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ही बातमी खूपच महत्वाची आहे. सिडकोच्या २६००० घरांच्या किमती नुकताच जाहीर झाल्या. २५ लाख ते ९७ लाखांपर्यंत हे घर मिळणार आहे. ईडब्ल्यूएस म्हणजेच आर्थिक दुर्बळ घटक गटासाठी घरांच्या किमती २५ ते ४८ लाखांपर्यंत घर मिळणार आहे. एलआयजी म्हणजे अत्यल्प गटासाठीच्या घरांच्या किमती ३४ लाख ते ९७ लाखांपर्यंत असणार आहे.

नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये सिडकोची ही घरं असणार आहेत. या सिडकोच्या या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या घरांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १० जानेवारी आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी तुमच्याकडे फक्त १ दिवस शिल्लक राहिला आहे. त्यामुळे लवकरता लवकर तुम्ही अर्ज भरा.

सिडकोनं 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' योजनेच्या तब्बल २६००० घरांच्या किमती जाहीर केल्या आहेत. सिडकोंच्या घराच्या किंमती २५ लाखांपासून सुरू होणार आहे. तर या किमती ९७ लाखांपर्यंत असणार आहेत. सिडकोच्या या योजनेअंतर्गत तुम्हाला नवी मुंबईमध्ये घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सिडकोच्या या लॉटरीसाठी आपल्यालाही चांगल्या ठिकाणी घर मिळावे असे सर्वांची इच्छा आहे.

आर्थिक दुर्बल घटक EWS -

तळोजा सेक्टर - २८ ते २५.१ लाख

तळोजा सेक्टर - ३९ ते २६.१ लाख

खारघर बस डेपो - ४८.३ लाख

बामणडोंगरी - ३१.९ लाख

खारकोपर 2A, 2B - ३८.६ लाख

कळंबोली बस डेपो - ४१.९ लाख

अल्प उत्पन्न गट (LIG) -

- पनवेल बस टर्मिनस - ४५.१ लाख

- खारघर बस टर्मिनस- ४८.३ लाख

- तळोजा सेक्टर 37 - ३४.२ लाख ४६.४ लाख

- मानसरोवर रेल्वे स्टेशन - ४१.९ लाख

- खांदेश्वर रेल्वे स्टेशन - ४६.७ लाख

- खारकोपर ईस्ट - ४०.३ लाख

- वाशी ट्रक टर्मिनल - ७४.१ लाख

- खारघर स्टेशन सेक्टर वन A- ९७.२ लाख

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT