Cidco vacancy In Navi Mumbai Saam Tv
मुंबई/पुणे

CIDCO Recruitment in Navi Mumbai: सिडकोत विविध पदांसाठी भरती, मिळणार अनेक प्रकल्पांना गती

CIDCO Vacancy In Navi Mumbai: सिडको महामंडळात अनेक नव्या रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.

कोमल दामुद्रे

नवी मुंबई : सिडकोने आधीपासूनच पायाभूत सुविधांबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य सुविधांच्या सुयोग्य नियोजनावर नेहमीच भर दिला आहे. यालाच लक्षात घेऊन सिडको महामंडळात अनेक नव्या रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.

सध्या सिडकोचे नवी मुंबई (Navi Mumbai) आंतरराष्ट्रीय विमानतळ, महागृहनिर्माण योजना, नवी मुंबई मेट्रो, नैना, कॉर्पोरेट पार्क असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना अधिक गती देण्याच्या उद्देशाने तसेच सिडकोतर्फे देण्यात येणाऱ्या सेवा नवी मुंबईकरांना अधिक वेगवान व कार्यक्षमतेने देण्यासाठी ही पदभरती महत्वपूर्ण ठरणार आहे.

सिडको महामंडळात कार्यकारी अभियंता, सहाय्यक कार्यकारी अभियंता, सहाय्यक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजनकार, अर्थशास्त्रज्ञ, सहाय्यक विधी अधिकारी या वर्ग-1 श्रेणीतील पदांकरिता भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सिडकोच्या संकेतस्थळावरून (Website) अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सिडकोतर्फे वर्ग-1 श्रेणीतील कार्यकारी अभियंता (स्थापत्य), साहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (विद्युत), साहाय्यक कार्यकारी अभियंता (विद्युत), साहाय्यक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजनकार, अर्थशास्त्रज्ञ आणि साहाय्यक विधी अधिकारी अशा विविध पदांची भरती करण्यात करण्यात येत आहे. या भरतीसंबंधीची जाहिरात वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली असून http://www.cidco.maharashtra/ या संकेतस्थळावर विस्तृत जाहिरात आणि माहिती (Information) आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

Samruddhi Expressway Bus Fire : समृद्धी महामार्गावर थरार! १२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसने घेतला पेट, नेमकं काय घडलं?

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगानंतर पगारात होणार भरघोस वाढ; तुम्हाला किती मिळणार? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: शिंदेसेना-भाजप आमदारांमधील संघर्ष शिगेला, ११७ कोटींच्या रस्ते कामाच्या आदेशाला स्थगिती

Sanitary Pads Prolonged Use: दीर्घकाळ सॅनिटरी नॅपकीन वापरल्याने कॅन्सर होतो? पाहा तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT