CIDCO Viral Video Saam Tv
मुंबई/पुणे

CIDCO Viral Video: सिडकोतील कर्मचाऱ्यांचा प्रताप! ऑफिसमध्येच रंगली गाण्यांची मैफील; VIDEO व्हायरल

CIDCO Employees Viral Video: बेलापूरच्या सिडकोच्या ऑफिसमध्ये कर्मचारी कामाच्या वेळेत गाणी गाताना दिसले आहेत. या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिडको नैना विभागाच्या अकाउंट विभागातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.बेलापूरच्या सिडको विभागातील नैना कार्यालयात कामाकाजाच्या वेळेत गाण्यांची मैफिल रंगली आहे. कामाच्या वेळेत कर्मचाऱ्यांनी गाणी गायली आहेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सिडकोच्या कार्यालयात सुरक्षा रक्षकांसमोरच कर्मचारी गाणी गाताना दिसत आहे. कर्मचारी माईकवर मोठ्या आवाजात गाण गाताना दिसत आहे. नैना प्रकरणी जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका प्रकल्पग्रस्त नागरिकाने या घटनेचा व्हिडिओ काढला आहे.

कर्मचाऱ्यांनी थेट ऑफिसमध्येची गाण्यांची अंताक्षरी सुरु केली आहे. त्यामुळे कामासाठी आलेल्या नागरिकांचे काम वेळेवर होत नसल्याचे दिसत आहे. यामुळे विंडोबाहेर उभे असलेल्या नागरिकांना वाट पाहावी लागते. त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले दिसत आहे.

कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी हा हलगर्जीपणा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी असं टाईमपास करणे हे महाराष्ट्र नागरी सेवा कायद्याचे उल्लंघन असल्याचे सांगितले आहे.

सिडको कर्मचाऱ्यांच्या या हलगर्जीपणावर सिडको काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.सिडकोच्या कर्मचाऱ्यांनी कामाच्या वेळेत हा टाईमपास करणे खूप चुकीचे आहे, असं मत नागरिकांनी मांडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

SCROLL FOR NEXT