Arrest Saam Tv
मुंबई/पुणे

Chunabhatti: अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी उत्तर प्रदेशातील मुलास अटक

साधारणत: ताे नोव्हेंबरपासून उत्तर प्रदेशात असल्याची माहिती मिळाली.

जयश्री मोरे

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात फरार असलेल्या उत्तर प्रदेशातील (uttar pradesh) एकास अटक (arrest) करण्यात चुनाभट्टी (Chunabhatti) पोलिसांना (police) यश आले आहे. संशयित आराेपीस सापळा रचून पाेलिसांनी अटक केली. (mumbai crime latest marathi news)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संबंधित संशयित आरोपीने लग्नाच्या बहाण्याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला. त्याच्याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर ताे अनेक महिन्यांपासून फरार हाेता. साधारणत: ताे नोव्हेंबरपासून उत्तर प्रदेशात असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पीआय अनिल देसाई आणि चुनाभट्टी पोलीस स्टेशनचे पीआय युनूस शेख यांना संशयित आरोपी मुंबई कुर्ला कुरेशी नगर येथे आला असल्याची माहिती खब-यांच्या माध्यमातून मिळाली. चुनाभट्टी पोलिसांनी सापळा रचत संशयित आरोपीस अटक केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT