Chitra Wagh Slams CM Saam Tv
मुंबई/पुणे

Chitra Wagh To CM: थोडी अक्कल उरली असेल तर महिलांच्या सुरक्षेसाठी वापरा...

Chitra Wagh To CM: चित्रा वाघ यांनी महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन सरकारला धारेवर धरत मुख्यमंत्र्यांवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीएमसीच्या एका ऑनलाईन लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात नाव न घेता भाजपवर टीका केली होती. प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही असा टोला त्यांनी भाजपला लगावला होता. त्याच्या याच वक्तव्याचा समाचार भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी घेतला आहे. त्यांनी महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन सरकारला धारेवर धरत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर (Uddhav Thackeray) खोचक शब्दांत टीका केली आहे. (chitra wagh slams to cm about women security issues)

हे देखील पहा -

चित्रा वाघ म्हणाल्या की, इंदापुरमधील शाळकरी विद्यार्थिनीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. मालेगांव ने एका तरुणीने आत्महत्या केली. या दोन्ही केसेस मध्ये पोलीसांनी योग्यवेळी दखल घेतली असती तर त्यांचे जीव वाचले असते. काल खूप दिवसांनी मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून जनतेच्या समोर आले. २५ हजार महिला राज्यातून गायब असताना, रोज आत्महत्या होत असताना महिलांच्या सुरक्षेवर एकही शब्द न बोलता व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंग बंद केली.

प्रश्न विचारायला नाही तर प्रश्न सोडवायला अक्कल लागते. गेल्या २ वर्षात वसुली करण्यात, बदल्यांमधली मलई खाण्यात, गांजाबहाद्दरांना वाचवण्यात आणि गुन्हेगारांना पाठीशी घालण्यात वापरलेली अक्कल राज्याने पाहिलीये. थोडी अक्कल सरकारकडे उरली असेल तर महिला सुरक्षेसाठी वापरा अशा थोचक शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT