Chitra Wagh Saam tv
मुंबई/पुणे

Chitra wagh News: टोल कर्मचाऱ्यांना महिलेची शिवीगाळ; चित्रा वाघ यांनी थेट गृहमंत्र्यांकडे केली कारवाईची मागणी

व्हायरल व्हिडिओनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट गृहमंत्र्याकडे या महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Vishal Gangurde

Chitra Wagh News: टोलनाक्यावर अनेकदा टोल भरण्यावरून होणारे वाद नवीन नाहीत. टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या व्हिडिओनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र पोलीस यांना कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

सदर व्हिडिओ कोणत्या टोलनाक्यावरील आहे, याची माहिती अद्याप मिळाली नाही. मात्र, या व्हायरल व्हिडिओवरून चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, गेल्या दोन दिवसांपासून एका व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहण्यात आला. ज्यात १ महिला गाडीत बसून (बहुतेक टोल नाक्यावर असावी) अत्यंत अश्लाघ्य भाषेत कुणाशी तरी बोलतांना दिसत आहे. त्या बाईने माझ्या नावाचा उल्लेख त्यात केलाय'.

'बरेच फोन /मॅसेज आले मी त्या बाईला ओळखते किंवा काय .., मला सगळ्यांना सांगायचंय ही बाई कोण मला माहीत नाही, मी या बाईला ओळखतही नाही. या बाई आमच्या भाजपा पक्षाच्या पदाधिकारी/कार्यकर्त्या नाहीत आणि माझी समर्थक असण्याचा तर प्रश्नचं नाही. यासंदर्भात पोलिसांनी या व्हिडिओतील महिलेला शोधून काढत तिच्यावर तात्काळ कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी ही पोस्ट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग केली आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट केल्यानंतर एका युजरने म्हटले आहे की, 'ताई आपण दिलेले स्पष्टीकरण कोणाला पटो न पटो पण आपण घेतलेली भूमिका योग्य आहे असं मला वाटतं. ती महिला कदाचित तुमच्या ओळखीचीही असेल, पण पुन्हा तिची अशी हिम्मत होणार नाही. चूकीला चूक म्हणायला शिकलं पाहिजे. नाहीतर राजकीय व्यभिचार वाढत जाईल'. दरम्यान, या महिलेवर कारवाई केली जाईल का, हे आता पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Bajra Soft Bhakri Tips: बाजरीची भाकरी थापताना तुटते? फुगतच नाही? '१' भन्नाट Idea, सॉफ्ट भाकरीचं सिक्रेट

Zarine Khan Funeral : जरीन खान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आईला अखेरचा निरोप देताना लेक ढसाढसा रडला, पाहा VIDEO

Western Railway Block : मुंबईकरांनो लक्ष असू द्या! पश्चिम रेल्वेवर रविवारी ५ तासांचा जम्बो ब्लॉक, वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा |VIDEO

Oppo Find X9: भारतात २०० एमपी कॅमेरासह 'हा' नवीन फोन होणार लाँच, कंपनीने दिली ९९ रुपयांची खास ऑफर

SCROLL FOR NEXT