Urfi Javed-Chitra Wagh News SAAM TV
मुंबई/पुणे

Chitra Wagh: 'ऊर्फीला जास्त कपड्याची ॲलर्जी, तिला आधी साडी चोळी देऊ अन नंतर....' चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

महिला आयोगाने पाठवलेल्या नोटीशीनंतर चित्रा वाघ यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्यावर सडकून टीका केली.

Gangappa Pujari

Chitra Wagh: उर्फी जावेद प्रकरणावरुन आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. उर्फी जावेद प्रकरणात महिला आयोग दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. त्यावर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचा अपमान केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांनाच नोटीस पाठवली होती.

या नोटीसीनंतर चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही रुपाली चाकणकरांना खडेबोल सुणावले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, चित्रा वाघ यांनी आज महिला आयोगाने पाठवलेल्या नोटीशीनंतर पुण्यात पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी बोलताना "माझा आक्षेप हा महिला आयोगावर नसून महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर आहे." असे त्या म्हणाल्या.

"अध्यक्षा म्हणजे संपूर्ण महिला आयोग नसतो. मला पाठवलेली नोटीस सर्व सदस्यांच्या सहमतीने पाठवली आहे का? असा सवाल त्यांनी रुपाली चाकणकरांना विचारला. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आम्हीं नगा नाच चालू देणार नाही," असा पुन्हा उल्लेख केला. तसेच रुपाली चाकणकरांनी कपड्याच्या तुकड्यावर बोलत आहे, कपड्यावर नाही,असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. "

त्याचबरोबर पुढे बोलताना चित्रा वाघ यांनी "उर्फी ला जर जास्त कपड्याची एलर्जी आहे, तर आपल्याकडे औषधं आहेत, असे म्हणत उर्फीचं थोबाड फोडण्यापूर्वी एकदा तिला साडी चोळी देऊ, साडी चोळी देऊन ऐकलं नाहीतर तिचं थोबाड फोडू," असा इशाराही दिला. दरम्यान, या वादावर अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी कौतुक करत सामाजिक स्वैराचाला खतपाणी घालू नका, अशी दादांनी भूमिका मांडली ती योग्य आहे असेही त्या यावेळी म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT