Pune Dog Attack Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: घरासमोर खेळताना चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला, फरफटत नेत शरिराचे लचके तोडले; थरकाप उडवणारा VIDEO

Pune Dog Attack Video: पुण्यामध्ये मोकाट कुत्र्यांनी चिमुकलीवर हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकली जखमी झाली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

पुण्यामध्ये कुत्र्यांनी चिमुकल्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. दोन कुत्र्यांनी चिमुकलीवर हल्ला केला. तिच्या शरीराचे लचके तोडले आणि फरफटत नेले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली आहे. पुण्यातील वडगाव शेरीमध्ये अंगणात खेळत असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. हल्ल्यादरम्यान कुत्र्यांनी चिमुकलीला ओढत नेलं. हल्ल्याची ही संपूर्ण सीसीव्हीत सीसीटीव्हीत कैद झाली आहे. घटनास्थळावर दोन पुरूष वेळीच आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यामध्ये चिमुकली जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. पिंपरी- चिंचवडमध्ये कुत्र्यांनी तरुणावर हल्ला केला. चिखली मोरे वस्ती येथे पहाटे पाचच्या सुमारास कामावर जाणाऱ्या तरुणावर ७ कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला चढवला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कैद झाला आहे. यात तरुण जखमी झाला आहे. त्याने स्वतःला वाचवण्यासाठी फ्लेक्स बोर्ड आणि दुचाकीचा आधार घेतला.

दुचाकी कुत्र्यांच्या अंगावर ढकली. तरीही कुत्रे तिथून जायला तयार नव्हते. अखेर काही मिनिटांनी काही नागरिक घराबाहेर आल्यानंतर तिथून कुत्र्याची टोळी बाजूला झाली. पण ते तिथेच घुटमळत होते. त्यानंतर पुन्हा त्यांनी तरुणाला चावा घेण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. महानगरपालिकेने तात्काळ या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT