Uddhav Thackeray And Narendra Modi  Saam Tv
मुंबई/पुणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

राजभवन येथे 'क्रांती गाथा' भूमिगत दालन व राज्यपालांच्या 'जलभूषण' निवासस्थानाच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित झाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राजभवन येथे 'क्रांती गाथा' भूमिगत दालन व राज्यपालांच्या 'जलभूषण' निवासस्थानाच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित झाले आहेत. 'क्रांती गाथा' भूमिगत दालनाच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकाच मंचावर उपस्थित होते. 'क्रांती गाथा' भूमिगत दालनाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपस्थितांशी संवाद साधला. तसेच कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

'क्रांती गाथा' भूमिगत दालनाच्या उद्घाटन सोहळ्यात संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत. त्यासाठी किती जणांनी आपल्या घरादारावर निखारे ठेवले, किती जणांनी बलिदान दिलं, किती जणांनी मरण यातना सोसल्या.  क्षणभर विचार केला हे असं घडलं नसतं तर आपण हे स्वातंत्र्य उपभोगू शकलो असतो का हा प्रश्न मनात येतो'.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, 'आपल्याला स्वातंत्र्य असंच नाही मिळाले, ते कुणी आपल्याला आंदण नाही दिलं हे स्वातंत्र्य आपल्याला लढून मिळवावं लागलं आहे. तो इतिहास नुसता जतन नाही तर जिवंत करणं हे आपलं काम आहे. काळ पुढे जात आहे. आपण पारतंत्र्यात १५० वर्षे होतो. आता  स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली, पुढे जात असतांना हा वारसा पुढच्या पिढीला देण्याच काम केलं नाही, तर मला वाटतं आपण आपल्या कर्तव्याला मुकतो आहोत. आज एक अप्रतिम काम आपण करत आहोत'.

'ज्ञात अज्ञात क्रांतीकारकांचे ज्यांनी देशासाठी त्याग केला त्यांचे संकलन व्हायला पाहिजे म्हणून एक पुस्तक आपण तयार करत आहोत. नुसतं बोलत बसण्यापेक्षा क्रांतीकारकांनी ज्या गोष्टी केल्या त्यांच्या त्यागाच्या एक कण जरी काम आपण करू शकलो तरी त्यांचे बलिदान कृतार्थ होईल', असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हटले.

'काळ बदलत असला तरी या परिसराने इतिहासाच्या पाऊलखुणा नेहमीच जपल्या आहेत.  त्याला धक्का न लावता नुतनीकरण करणं, आधुनिक तंत्रज्ञान हे काम करणं खूप मोठी गोष्ट. कलात्मक नजरेने याकडे पहातांना प्रत्येक ठिकाणी त्याचे सौंदर्य दिसते. इतक्या चांगल्याप्रकारे हे नुतनीकरणाचे काम करण्यात आले आहे',असे देखील ठाकरे यांनी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

Rahuri By-Election: पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं?

SCROLL FOR NEXT