Cm Eknath shinde
Cm Eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

Breaking News |पावसामुळे बाधित झालेल्यांना तातडीने मदत देण्याचे Cm शिंदेंचे निर्देश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: गेल्या काही दिवसापासून राज्यातील काही भागात ढगफुटीसदृश्य पाऊस (Rain) सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला आहे. मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची माहिती घेतली असून या पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरविण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत.

तातडीने मदतीच्या सूचना

ढगफुटीसदृश्य पाऊस झालेल्या गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत पोहोचविण्याच्या सूचना देतानाच मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नुकसानीची आणि मदतकार्याची माहिती घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

राज्यातील अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस सुरू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सांगली, सातारा, कोल्हापुरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊसाची उभी पीकांचे नुकसान झाले आहे, तर काल बारामती परिसरात मोठा पाऊस झाला आहे, त्यामुळे येथीलही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

S Jaishankar: कोणाच्या तरी चुकीमुळे काश्मीरचा भाग गमावला; परराष्ट्रमंत्र्यांनी नेहरूंवर साधला निशाणा

Janhvi Kapoor : जान्हवीचं मनमोहक सौंदर्य; घायाळ करणाऱ्या अदांनी चाहते क्लिन बोल्ड!

Health Tips: डायबिटीजच्या रुग्णांनी अशापद्धतीने खावा भात, नाही वाढणार शुगर लेव्हल

Kangana Ranaut : ५ कोटींचे दागिने अन् महागड्या अलिशान कार; संपत्ती वाचून डोळे फिरतील

SCROLL FOR NEXT