Sanjay Raut vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

कामाख्या देवी म्हणाली 'तो' रेडा आम्हाला नको; एकनाथ शिंदेंचा राऊतांना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत तुफान फटकेबाजी केली

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारची बहुमत चाचणी पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सभागृहात आपलं मत व्यक्त केलं. यावेळी शिंदे म्हणाले, 'लढून शहीद झालो तरी चालेल, पण आता माघार घेणार नाही. काही लोकं म्हणत होते की, आम्ही 40 रेडे पाठवले. पण मॉं कामाख्या देवी बोलली, जो बोलला आहे तो रेडा आम्हाला नको', असं म्हणत एकनाथ शिंदेंनी संजय राऊत (Shivsena) यांना नाव न घेता टोला लगावला. (CM Eknath Shinde latest News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी कालही शिवसैनिक होतो आणि आजही शिवसैनिक आहे. माझा जो अजेंडा आहे तो मी कधीच सोडू शकत नाही. त्यामुळे काही लोकं आता सांगत होते, कुणी आम्हाला गटार नाल्याची घाण म्हणून संबोधत होते. कुणी म्हणत होतं की, कामाख्या देवीला बळी देणार, आता कामाख्या देवींनी कुणाचा बळी घेतला. असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला.

इतकच नाही तर, काही लोकं म्हणत होते की, कामाख्या देवीला आम्ही 40 रेडे पाठवले. पण काही लोकं आमचा बळी देण्यापासून ते काहीही बोलत होते. मॉं कामाख्या देवी बोलली, जो बोलला आहे तो रेडा आम्हाला नको', असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना नाव न घेता टोला लगावला आहे.

पुढील निवडणुकीत 200 आमदार निवडून आणणार

अजित पवार म्हणाले, पुढच्यावेळी बंडखोर आमदार निवडून येणार नाहीत. मात्र, आम्ही शिवसेना सोडलेली नाही. भाजपासोबत आम्ही पुढील विधानसभा निवडणुकीत २०० आमदार निवडून आणू , असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

अजित पवार यांनी माझ्या खात्याच्या बैठका घेतल्या तरी मी त्यांना काही बोललो नाही. त्यांनी ८०० कोटी रुपये घेतले तरी मी काही बोललो नाही. मात्र, तुम्ही समांतर नगरविकास खात्याचा प्रमुख का केला? असा सवालही त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना केला आहे.

Edited By Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSRP Number Plate : HSRP नंबर प्लेट नसल्यास होणार दंडात्मक कारवाई; वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी

'हा तर शिंदे-फडणवीसांच्या विरोधातील गेम प्लॅन, दिल्लीतून हात असल्याचा संशय'; मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा

Maharashtra News Live Update: देशातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर– राज ठाकरे

Vastu Tips : किचनच्या भिंतींसाठी कोणता रंग शुभ? जाणून घ्या वास्तू शास्त्रानुसार कोणता रंग योग्य? वाढेल सकारात्मक उर्जा

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत; मुलुंड, ठाणे अन् कांजूरमार्ग परिसरात सिग्नल यंत्रणेत बिघाड, मुंबईकरांचे हाल

SCROLL FOR NEXT