मुंबई- गोवा महामार्गावर टॅंकरमधून केमिकल गळती Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबई- गोवा महामार्गावर टॅंकरमधून केमिकल गळती !

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगाव गावच्या हद्दित अचानक या टँकरच्या मागली बाजुस पाईपला छिद्र पडले. यामुळे या छिद्रातून केमिकल गळती झाली. हे केमिकल वाहून बाजूला असलेल्या शेतात गेल्याने पिकाचे नुकसान झाले आहे.

दिनेश पिसाट

दिनेश पिसाट

रायगड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर Mumbai-Goa National Highway नडगाव Nadgaon गावच्या हद्दीत महाड एम आय डि सी MIDC मधिल सरस्वती केमिकल्स या कंपनीचा टेंकर एम आय डि सी मधून सल्फ्युरिक ॲसिड Sulphuric Acid घेऊन जात होता. यावेळेस या टँकरच्या मागली बाजुस पाईपला छिद्र पडले. यामुळे या छिद्रातून केमिकल Chemical गळती झाली आहे. हे केमिकल वाहून बाजूला असलेल्या शेतात गेल्याने पिकाचे नुकसान झाले आहे. Chemical leak from tanker on Mumbai-Goa highway

पाईप लीक झाल्यामुळे टँकर मधिल सल्फ्युरिक ॲसिड रस्त्यावर वाह्यायला सुरवात झाली. लालसर रंगाचे केमिकल्स रस्त्यावर पडल्याने आणि ॲसिडचा पाण्याशी संपर्क आल्याने धुर आणि पाण्यातुन वाफा येत होत्या. सदर प्रकार महाड एम आय डि सी पोलिसांना कळविण्यात आला. पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन सदर टँकर रस्त्याच्या बाजुला घेतला आहे.

हे देखील पहा-

महाड Mahad एम आय डी सी मधिल मार्क टिमला या घटनेबाबत कळविण्यात आले. मात्र तो पर्यंत मोठ्या प्रमाणात केमिकल्स लिक होऊन रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतात जाऊन मिसळले होते. भातलावणीत केमिकल्स शेतात गेल्याने शेतकरी अक्रमक झाले होते. आमच्या हता तोंडाशी आलेला घास या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे जातो कि काय आशी भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

घटना स्थळी मार्क टिमचे कर्मचारी प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित राहिल्याने सदर टँकरची गळती थांबवण्यात यश आले आहे. मात्र अचानक झालेल्या केमिकल गळती मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT