Chembur Gas Cylinder Blast News saam tv
मुंबई/पुणे

Chembur News: मुंबईतील चेंबूरमध्ये दुकानात गॅस सिंलिंडरचा स्फोट; अनेक जण जखमी, अग्निशमन दल घटनास्थळी

Chembur Gas Cylinder Blast News: चेंबुरमधील कॅम्प परिसरातील एका दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. गॅस सिलेंडरच्या स्फोटमध्ये दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेंबूर कॅम्प येथे सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आहे. चेंबूर कॅम्प परिसरातील एका दुकानात हा सिलेंडरचा स्फोट झाला आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत.

चेंबूर कॅम्पमधील ज्या दुकानाला आग लागली ते दुकान मुख्य रस्त्यावर आहे. त्यामुळे स्फोट झाल्याने अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्नीशमन दलाचे अधिकारी दुकानाची पाहणी करत आहे.

चेंबूरमधील मुख्य रस्त्यावर एका दुकानात अचानक स्फोट झाला. त्यामुळे बाहेरुन जात असलेल्या नागरिकांना त्रास झाला. तसेच बाहेर उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या, गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सिलेंडरचा स्फोट झालेल्या दुकानाचे खूप नुकसान झाले आहे. या दुकानाचे छत खाली पडले आहे. सर्व सामान इकडे-तिकडे पडले आहे. त्यामुळे दुकानमालकाचे खूप नुकसान झाल्याचे दिसत आहे. हे दुकान कशाचे होते, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मिरा रोडमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट

काही दिवसांपूर्वी मिरारोड पूर्वच्या रामदेव पार्क रोड परिसरात बिल्डरांच्या मोकळ्या जागात पाच सिलेंडरचा स्फोट झाला होता. या घटनेत बिल्डरकडे काम करणाऱ्या अनेक कामगारांच्या झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT