local train ladies fight  Saam tv
मुंबई/पुणे

मोबाइल ओढला, धक्का दिला; लोकलच्या महिला डब्यात तुफान राडा, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

local train ladies fight : लोकलमधील गर्दीमुळे आता जनरल डब्यानंतर लेडीज डब्यानंतरही हाणामारीच्या घटना घडू लागल्या आहेत. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला आहे.

Vishal Gangurde

मुंबई लोकलच्या महिला डब्यात महिलांची हाणामारी

ठाणे ते डोंबिवलीदरम्यान घडली घटना

लोकलमधील किरकोळ कारणावरून वाद मारहाणीपर्यंत पोहोचला

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

मुंबई लोकलमध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली आहे. लोकल डब्यात व्यवस्थित उभे राहण्यासाठी जागा नसते. याच लोकल डब्यात किरकोळ गोष्टींवरून दोन प्रवाशांमध्ये वाद होतो. अनेकदा किरकोळ वाद हाणामारीपर्यंत पोहोचतात. लोकलच्या महिला डब्यातही हाणामारीच्या घटना घडू लागल्या आहेत. अशीच एक लोकलच्या महिला डब्यात हाणामारीची घटना समोर आला आहे.

ठाण्याहून आसनगावच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये महिलांमध्ये जोरदार वाद होऊन त्याचे रूपांतर मारहाणीमध्ये झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. ठाणे ते डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान संध्याकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती हाती आहे.

गर्दीच्या वेळी एका महिलेला बाजूला सरक असे सांगितल्यावरून दुसरी महिला संतापली. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच चिघळला. त्यानंतर संतप्त महिलेने समोरच्या महिलेला बेदम मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ इतर प्रवाशांनी मोबाईलमध्ये कैद केला आहे. तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये महिलांमधील जोरदार झटापट दिसत आहे.

या प्रकरणी संबंधित महिलेविरोधात रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या व्हिडिओवरून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. लोकलमधील हाणामारीचं प्रकरण पोलिसांत पोहोचल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलीस आता काय कारवाई करतात, हे पाहावे लागेल. परंतु गर्दीच्या लोकलमध्ये अशा वाढत्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकलमधील ही घटना कुठे घडली?

ठाणे ते डोंबिवलीदरम्यान जाणाऱ्या मुंबई लोकलमध्ये महिलांमध्ये झटापट घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्यातून वगळंल

Property Tax Hike : मालमत्ता करात मोठी वाढ! घर खरेदी-विक्रीही महागणार; जाणून घ्या A to Z माहिती

दुकान उघडताना शटरवर चावी का वाजवतात? कारण ऐकून थक्क व्हाल

आधी नोकरीचा राजीनामा दिला, नंतर डॉक्टरनं उचललं टोकाचे पाऊल; आरोग्य विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT