MNS Mla Raju Patil On Chandrashekhar Bawankule Saam Tv
मुंबई/पुणे

Chandrashekhar Bawankule Casino: बावनकुळेंनी कॅसिनोत गेल्याचे मोठ्या मनाने मान्य करायला पाहिजे हाेते : मनसे आमदार राजू पाटील

MNS Mla Raju Patil: बावनकुळेंनी कॅसिनोत गेल्याचे मोठ्या मनाने मान्य करायला पाहिजे हाेते : मनसे आमदार राजू पाटील

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

MNS Mla Raju Patil On Chandrashekhar Bawankule:

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कॅसिनोत गेल्याचा फोटो व्हायरल केला होता. त्यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार पाटील म्हणाले आहेत की, कॅसिनो हे उत्पनाचे साधन आहे. महाराष्ट्राला लागूनच गोव्यात कॅसिनो सुरु आहे. महाराष्ट्रात उत्पन्नाचे साधन असलेले कॅसिनो सुरु केले नाही. राज्यात उत्पन्नाच्या गोष्टींना विरोध करायचा आणि परदेशात जाऊन कॅसिनोत बसायचे. बावनकुळे कॅसिनोतच बसलेत. मी स्वतः त्या कॅसिनोत गेलोय. कॅसिनोत खेळणं म्हणजे माणूस जुगाराच्या आहारी गेला, असं होत नाही. माणूस टाइम पास म्हणून पण जातो. बावनकुळे यांनी मोठ्या मनाने कॅसिनोत गेल्याचे मान्य करायला हवे होत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनसे आमदार राजू पाटील यांनी घेतली आयुक्त इंदूराणी जाखड यांची भेट

नव्या महिला आयुक्तांची नियुक्ती झाल्यावर नव्या आयुक्त जाखड यांची आज राजू पाटील यांनी भेट घेतली. या भेटीनंतर राजू पाटील यांनी नव्या आयुक्तांची इच्छा शक्ती असल्यास फेरीवाल्यांचा प्रश्न सुटू शकतो. त्यासाठी केवळ अधिकार गाजवायचे आहेत, असं ते म्हणाले. (Latest Marathi News)

पुढे बोलताना नव्या महिला आयुक्त जाखड यांची यापूर्वी ज्याठिकाणी काम केले आहे. ते चांगले आहे. कल्याण डोंबिवली ही जुळी शहरे आहेत. या शहराच्या विकासासाठीही त्या चांगलेच काम करतील. त्यांची आज भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच स्वत: आमदार आणि मनसे पक्षाचे आयुक्तांना चांगल्या कामाकरीता नेहमीच सहकार्य असेल, असे आमदार पाटील यांनी आयुक्तांना सांगितले.

त्यांच्यावर राजकीय दबाव येऊ शकतो का? असा प्रश्न आमदार पाटील यांच्याकडे उपस्थित केला असता ते म्हणाले की, आयुक्तांबाबत काही राजकारण होऊ नये, ही देवाला प्रार्थना. मात्र राजकारण होईल असे वाटत नाही ,आगामी निवडणूकीची वेळ पाहता, त्यांच्यावर दबाव येईल, असे वाटत नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सौरभ दास, आशुतोष रांका यांना जामीन मंजूर

Winter Skin Care: हिवाळा सुरू होण्याआधी स्किन केअरमध्ये करा हे ७ बदल; त्वचा होईल मुलायम आणि चमकदार!

Satara District Bank Election: महायुतीचा जागावाटपाच फॉर्म्युला ठरला, अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी मोठी घडामोड

Diwali Horoscope : दिवाळीत 'या' ३ राशींची चांदीच चांदी! पैसा, प्रगती अन् धनलाभाचे संकेत

Dhasal Movie: 'प्रहार'नंतर ललित प्रभाकरचा नवा अंदाज; 'ढसाळ'चा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT