मुंबई - आज तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Chandrashekhar Rao)मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. दुपारी १ वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव भेट घेणार आहेत. दुपारी १ वाजता वर्षा बंगल्यावर पोहचल्या नंतर दुपारचं जेवण करणार आणि त्यानंतर दोन्ही उभयतांमध्ये बैठक होणार.
हे देखील पहा -
मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्या नंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दुपारी ४ वाजता सिल्वर ओक या ठिकाणी भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राव यांना भोजनाचं आमंत्रण दिल्यानं राव मुंबईत येणार असल्याचे बोलले जात आहे. बिगर भाजप शासित मुख्यमंत्र्यांची एकजूट करण्याचा राव यांचा प्रयत्न आहे.
देशातील भाजप आणि केंद्र सरकारच्या दबावाविरोधात बिगर भाजप शासित राज्यज्यांचे मुख्यमंत्री एकत्र येणार का? हे आता पाहावे लागणार आहे. ठाकरे, पवार आणि राव यांच्या आज होणाऱ्या बैठकीकडे सर्वांच लक्ष लागलेले आहे. दरम्यान, याआधी देखील बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत आल्या होत्या तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.