Chandrakant Patil News Saam TV
मुंबई/पुणे

Chandrakant Patil On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर चंद्रकांत पाटलांनी दिले स्पष्टीकरण; म्हणाले, बाळासाहेब...

Chandrakant Patil News: बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत मनात श्रद्धा आहे, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

Prachee kulkarni

Chandrakant Patil News: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या 'बाबरी'वरील वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर चंद्रकांत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत मनात श्रद्धा आहे, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. (Latest Marathi News)

चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले, 'बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल माझ्या मनात श्रद्धा आहे. 'बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबत श्रद्धा नाही, असं माझ्या तोंडून निघणार नाही. त्या मुलाखतीत मी आदरच व्यक्त केला आहे'.

'विषय अयोध्येचा सुरू आहे. 'बाबरी'चा ढाचा पाडताना विश्व हिंदू परिषदेचा बॅनर होता. बाबरी हिंदूंनी पाडली. मला कुणाचा अनादर करायचा नव्हता. माझा त्यातला जो सवाल आहे, तेव्हा संजय राऊत कुठे होते? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

'माझ्या वक्तव्याचा विपर्यास यापूर्वीही अनेकदा केला गेला. राजकीय हेतूने वाद निर्माण करतात. बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत आदर आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी संबंध आहेत. त्यामुळे मी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर काही बोलणार नाही, असे चंद्रकांत पुढे म्हणाले.

'बाबरी मशीद पाडताना सगळे होते. विश्व हिंदू परिषदेचे लोक होते. इतर कोणताही बॅनर नव्हता. त्यामुळे शिवसैनिक होते असं म्हणणं चुकीचं आहे, असंही चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले.

'जयंत पाटील याबाबत काय म्हणतात, यावर मी कशाला बोलू? मला उद्धव ठाकरे यांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. मी त्यांना फोन करणार आहे. माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे. ते माध्यमावर बोलण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांचा देखील फोन आला होता, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: मन प्रसन्न राहील! ५ राशींच्या व्यक्तींचा दिवस आनंदात जाईल; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

SCROLL FOR NEXT