CHAKAN MIDC CRISIS: 20 COMPANIES MAY EXIT, 4000 JOBS AT RISK saam tv
मुंबई/पुणे

खड्डयांमुळे 20 कंपन्या चाकण सोडणार? खड्डे आणि वाहतूक कोंडीने उत्पादनावर परीणाम, 4 हजार कामगारांच्या रोजगारावर संकट

Chakan MIDC Crisis: चाकण MIDCतील खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसत आहे. या समस्यांना कंटाळून 20 लघुउद्योग स्थलांतराच्या तयारीत आहेत. मात्र यामुळे हजारो कामगारांच्या रोजगारावर संकट येण्याची शक्यता आहे. पाहूया एक रिपोर्ट...

Girish Nikam

औद्योगिक केंद्र असलेल्या चाकणमध्ये खड्ड्यांमुळे शेकडो जणांचा जीव गेल्यानंतर आता उद्योजकांनी मोठा निर्णय घेतलाय. MIDCतील पायाभूत सुविधांच्या अभावामुळे 20 उद्योगांनी खंडाळा MIDCमध्ये स्थलांतरासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

रोजची वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि अपघातांमुळे कंपन्यांच्या उत्पादनांवर मोठा परीणाम होतोय. या कंपन्या गेल्यास सुमारे एक हजार कोटींच्या उलाढालीवर परिणाम होणार आहे. त्यासोबतच 4 हजार कामगारांच्या रोजगारावर संकट येण्याची शक्यता आहे. चाकण आणि पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे अपघातांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जानेवारी 2025 ते जुलै 2026 या कालवधीत 580 जणांचा मृत्यू झाला आहे.

चाकणमधील या ज्वलंत समस्येवरुन खासदार अमोल कोल्हेंनी अधिकाऱ्यांवर निशाणा साधलाय. 59 कोटी रुपयांचं रस्त्याचं टेंडर निघूनही खड्डे बुजवले जात नाहीत, असा आरोप त्यांनी केला. खरतर केवळ चाकणच नाही तर खड्ड्यांची समस्या पुणे, मुंबईसह राज्यभरात आहे. नाशिकमध्ये तर खड्ड्यांच्या समस्येवरुन विशेष महासभा घ्यावी लागली. पण चाकणमध्ये खड्डयांमुळे कंपन्यांवर स्थलांतर करण्याची वेळ येत असेल तर ही यंत्रणेसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेनेतर्फे अवघ्या १० रुपयांत दिवाळी फराळ साहित्य वाटप

Worst Drinks for Kidney: किडनीला आतून पोखरतात हे 5 ड्रिंक्स; चवीच्या नादात आरोग्याचं नुकसान करू नका

Moong vs Chana Sprouts: मूग की चणा स्प्राउट्स, वजन कमी करण्यासाठी सकाळी नाश्त्याला काय खावे?

Pune Fort : मराठा साम्राज्याचा शेवटचा किल्ला कोणता? पुण्याजवळ लपलाय 'हा' ऐतिहासिक खजिना, दिवाळीच्या सुट्टीत नक्की फिरा

Farmers Protest: शेतकरी आंदोलनाचा तिसरा दिवस, पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्पच; परिवहन विभाग अन् गोकुळच्या दूध विक्रीला फटका

SCROLL FOR NEXT