Chakan container accident latest news saam tv
मुंबई/पुणे

Chakan Industrial Area: रस्त्यावर उभा कंटेनर ठरला काळ! दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा जागीच मृत्यू

Illegal Parking Of Heavy Vehicles: चाकण औद्योगिक वसाहतीतील शिंदे गावात भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी उभ्या कंटेनरला दुचाकीची धडक बसून दोन तरुण कामगारांचा जागीच मृत्यू झाला.

Omkar Sonawane

रोहिदास गाडगे, साम टीव्ही

चाकण औद्योगिक वसाहतीतील शिंदे गावात भीषण अपघाताची घटना घडली आहे. भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात कामावर जाणाऱ्या दोन तरुण कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, औद्योगिक वसाहतीतील अवजड वाहनांच्या बेकायदा पार्किंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गावातील भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी हा अपघात झाला. सकाळी कामावर जाणाऱ्या दोन तरुणांची दुचाकी रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून धडकली. धडक इतकी जोरदार होती की या अपघातात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही बिगारी कामगार असल्याची माहिती समोर आली आहे.

या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान चाकण औद्योगिक वसाहतीत रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. कंटेनर आणि इतर अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी योग्य व्यवस्था करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या अपघाताचा पुढील तपास उत्तर महाळुंगे पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन परतताना अनर्थ घडला; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

अमित शाहांची महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा! 1500 कोटींचे पॅकेज; टॅक्सीचालकांसाठी ही घेतला निर्णय

संसदेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार सुरू? सरकार कोणते विधेयक मांडणार?

Maharashtra News Live Update: पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात एनडीआरएफ टीम दाखल

विलिनिकरणाची चर्चा सुरू असतानाच सुनेत्रा पवारांना मोठा धक्का! चार दिग्गज नेते शिवसेनेत प्रवेश करणार; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT