CCTV Footage  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: भल्या सकाळी महिला रस्त्यावरुन जात होती, समोरुन दोघे आले अन् विपरित घडलं, थरकाप उडवणारा VIDEO

Pune News : चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत महिलांकडील तीन लाख रुपयांचे दागिने हिसकावून नेल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

Dnyaneshwar Choutmal

Pune News : पुण्यातील गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रोजच्यारोज काहीना काही गुन्हेगारीच्या घटना पुण्यातून समोर येत आहेत. महिलांचे दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांनीही धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत महिलांकडील तीन लाख रुपयांचे दागिने हिसकावून नेल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

पर्वती पायथा, कात्रज-कोंढवा रस्ता आणि बिबवेवाडी भागात या घटना घडल्या. पर्वती गाव परिसरात राहणारी महिला सकाळी सव्वासहाच्या सुमारास नंदादीप एज्युकेशन सोसायटी परिसरातून निघाली होती. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस याबाबत तपास करत आहेत.  (Latest Marathi News)

कात्रज-कोंढवा रस्त्यावरुन निघालेल्या एका महिलेच्या गळ्यातील एक लाख ३५ हजार रुपयांचे मंगळसूत्र, लक्ष्मीहार असा एक लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेला. महिलेने याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर बिबवेवाडी भागात सकाळी पावणेआठच्या सुमारास एका महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली.

महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटना सकाळी 6 ते 8 वाजण्याच्या सुमारे घडल्या आहेत. बिबवेवाडी, पर्वती पायथा तसेच कात्रज-कोंढवा रस्त्यावर दागिने हिसकावण्याच्या घटना एकपाठोपाठ घडल्या आहेत. वेगवेगळ्या भागात दागिने हिसकावणारे चोरटे एकच असावेत असा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले असून चोरांचा शोध घेण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गात ऐन उन्हाळ्यात दाट धुक्याची चादर

Arjun Tendulkar Wedding: 'मास्टर ब्लास्टर' होणार वरबाप; अर्जुन तेंडुलकर-सानियाच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची हजेरी, पाहा फोटो

Dhurandhar Actress : 'धुरंधर' गर्लवर बलात्काराचा प्रयत्न, स्पॉट बॉयचं काळं कृत्य सांगताना अभिनेत्रीचा संताप अनावर

Arjun Tendulkar Wedding : करोडपती आहेत अर्जुन तेंडुलकरच्या सासर कडचे, नेमका व्यवसाय काय करतात?

चंद्रग्रहणाचं सूतक ठरलं काळ! स्नानासाठी गेलेल्या ६ चिमुरड्यांचा वेदनादायी अंत; वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT