Ramdas Athwale Saam Tv
मुंबई/पुणे

मशिदींवर काढून भोंगे…. करू नका तुम्ही ढोंगे….! कवितेतून आठवलेंचा राज ठाकरेंना टोला

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिंदीवरील भोंगे उतरवण्याचा (Mosque Matter) इशारा गुढीपाडव्याला मनसेच्या मेळाव्यात दिला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात ठाकरे यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटल्याने राजकीय नेत्यांनी टीका-टीपण्णी केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तरसभेत मशिंदीवरील भोंगे ३ मे पर्यंत उतरवा, नाहीतर मनसे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा (Hanuman chalisa) वाजवणार. असा अल्टीमेटम देत राज यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. या सर्व घडामोंडीमुळं राज्यात मशिंदीवरील भोंग्यांमुळं वातावरण तापलं असून राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपांचा पाढा वाचायला सुरुवात केलीय. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय. राज ठाकरे यांना भगव्याचा इतका पुळका होता, तर त्यांनी शिवसेना सोडायला नको होती. राज ठाकरे यांच्या सभा मोठ्या असतात पण सभेत गर्दी असूनही त्यांना मतं मिळत नाही, अशा शब्दात रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना रामदास आठवले म्हणाले, राज्यात सध्या भोंग्याचं राजकारण तापलं आहे. मशिदींवरील भोंग्याबाबत राज ठाकरे यांची भूमिका चुकीची आहे. मशिदींवर काढून भोंगे.... करू नका तुम्ही ढोंगे....! अशाप्रकारे कवितेच्या माध्यमातूनही आठवले यांनी राज यांना टोला लगावला. राज ठाकरे यांच्या सभा मोठ्या असतात. ते वेल प्लॅन सभा घेतात पण सभेत गर्दी असूनही त्यांना मत मिळत नाही. असं खरमरीत टीकाही आठवले यांनी राज ठाकरेंवर केली आहे.

Edited By- Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT