Emergency medical room setup at Mumbai suburban railway station for passenger safety. Saam Tv
मुंबई/पुणे

मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर लवकरच मिळणार आपत्कालीन मेडिकल सुविधा

Central Railway Emergency Medical Rooms For Passengers: मध्य रेल्वे १० स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करणार आहे. प्रवाशांना तातडीची प्राथमिक मदत मिळणार असून, स्थानकांवर सुरक्षितता वाढेल.

Omkar Sonawane

मुंबई उपनगरी रेल्वेवरील प्रवाशांची वाढती संख्या आणि अपघात लक्षात घेता मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी म्हणून लवकरच १० स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. सध्या उपनगरी रेल्वे मार्गावर केवळ चार स्थानकांवर अशी सुविधा उपलब्ध आहे. मात्र नव्या कक्षांमुळे अपघात किंवा प्रकृती बिघडल्यास प्रवाशांना स्थानक परिसरातच त्वरित प्राथमिक उपचार मिळतील.

रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. अशावेळी अचानक प्रकृती बिघडणे, चक्कर येणे, अपघात होणे किंवा रेल्वे अपघातात जखमी होणे यासाठी तात्काळ उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. या पार्श्वभूमीवर ही सुविधा जीवनदायी ठरणार आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

कक्षासाठी खासगी संस्थांना परवाने

या वैद्यकीय कक्षांसाठी खासगी संस्थांना परवाने देण्यात आले असून, त्यातून मध्य रेल्वेला दरवर्षी सुमारे ४० लाख रुपयांचा महसूल होणार आहे. यामुळे प्रवाशांना सुविधा मिळणार आणि रेल्वेला उत्पन्न स्रोतही मिळेल, असा दुहेरी फायदा साधला जाईल.

'या' सुविधा मिळणार स्थानकांवर

टिटवाळा, कुर्ला, कर्जत, कळवा, लोकमान्य टिळक टर्मिनस, मानखुर्द, मुंब्रा, ठाणे, घाटकोपर आणि चेंबूर या स्थानकांवर हे कक्ष सुरू करण्याचे नियोजन आहे. परवाने २०३० पर्यंत वैध राहतील.

जखमी किंवा अपघातग्रस्त प्रवाशांसाठी पहिला एक तास ‘गोल्डन अवर’ मानला जातो. या काळात योग्य उपचार मिळाल्यास जीवितहानी टाळता येते. स्थानकांवर कक्ष उपलब्ध झाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वेच्या या निर्णयाचे स्वागत केले असून भविष्यात आणखी महत्त्वाच्या स्थानकांवर अशी सुविधा सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhendwal Bhavishyvani: यावर्षी पाऊस कसा राहिल? शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा; देशावर आर्थिक संकट, वाचा भेंडवळच्या घटमांडणीचा A टू Z अंदाज

Maharashtra News Live Update: भिवंडीच्या मूलचंद कंपाऊंडमध्ये ऑइलच्या गोदामाला भीषण आग

High Blood Pressure : हाय BP च्या रुग्णांसाठी 'हा' ज्यूस ठरतो वरदान, आताच डाएटमध्ये करा समावेश

Weight Loss Diet: डाएटमध्ये भाकरीसोबत खा ही एक भाजी, फॅट होईल ७ दिवसातच कमी

Maharashtra Government: राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा २२ वर्षांपूर्वीचा नियम बदलला

SCROLL FOR NEXT