Central Railway conducts overnight block work between Titwala and Vasind for platform expansion and 15-coach train operations. saam tv
मुंबई/पुणे

१५ डब्ब्याच्या लोकलसाठी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, कुठून कुठपर्यंत असणार? अनेक एक्सप्रेसवर होणार परिणाम

Central Railway Titwala To Vasind Block April 2026 Timing: मध्य रेल्वेकडून टिटवाळा ते वासिंद दरम्यान ११ एप्रिल रोजी मध्यरात्री विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्म विस्तार आणि १५ डब्यांच्या गाड्यांसाठीच्या कामांमुळे काही गाड्या नियंत्रित करण्यात येणार आहेत.

Omkar Sonawane

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामार्फत दिनांक १०/११.०४.२०२६ रोजी टिटवाळा व वासिंद स्थानकांदरम्यान विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक प्लॅटफॉर्म विस्तार कामांसाठी (१५ डब्यांच्या गाड्यांची सोय करण्यासाठी) आवश्यक असलेल्या अतिक्रमण हटविण्याच्या कामासाठी तसेच टिटवाळा आणि खडवली स्थानकांवरील नवीन पॉइंट्सवर ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) कार्यान्वित करण्यासाठी घेण्यात येत आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे.

ब्लॉकची माहिती खालीलप्रमाणे

दिनांक: १०/११.०४.२०२६ (शुक्रवार/शनिवार मध्यरात्र)

कालावधी: ११.०४.२०२६ रोजी ०२.१० ते ०३.२५ वाजेपर्यंत

ब्लॉक विभाग: टिटवाळा (समाविष्ट) ते वासिंद (वगळून) अप व डाउन मार्गावर

ब्लॉकमुळे होणारे परिणाम पुढीलप्रमाणे

११.०४.२०२६ रोजी ०२.२७ ते ०३.२५ या कालावधीत खालील गाड्या नियंत्रित करण्यात येतील:

12102 शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्सप्रेस वासिंद येथे थांबविण्यात येईल.

18030 शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस आसनगाव येथे थांबविण्यात येईल.

12810 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आटगाव येथे थांबविण्यात येईल.

20104 भटनी – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस खर्डी येथे थांबविण्यात येईल.

तसेच 01026 बलिया – दादर एक्सप्रेस आणि 01139 नागपूर – मडगाव विशेष एक्सप्रेस या गाड्या भुसावळ विभागात आवश्यकतेनुसार नियंत्रित करण्यात येतील.

उशिराने धावणाऱ्या मेल/एक्सप्रेस व प्रवासी गाड्यांबाबत त्यादिवशी घोषणा करण्यात येईल आणि त्या गाड्यांनाही कार्यानुसार नियंत्रित अथवा शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. हे ब्लॉक पायाभूत सुविधा देखभाल व सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगिर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भररस्त्यात गंदी बात! धावत्या दुचाकीवरील तरुणीच्या टॉपमध्ये घातला हात, तरुणांची विकृती; Viral VIDEO

Strawberry Shake Recipe: उन्हाळ्यात लहानमुलांसाठी झटपट बनवा टेस्टी रिफ्रेशिंग स्ट्रॉबेरी शेक

Maharashtra News Live Update: मुंबई विमानतळ टर्मिनल एक वर लागली आग

मुंबईत हॉस्पिटलमध्येच १९ वर्षाच्या तरूणीवर जबरदस्ती,मनसे कार्यकर्त्यांकडून नराधमाला चोप, नेमकं झालं काय?

Konkan Tourism : पांढरी वाळू अन् नारळाच्या बागा; कोकणातील ५ रमणीय समुद्र किनारे, प्लान करा Summer ट्रिप

SCROLL FOR NEXT