Mumbai Local News Saam Tv
मुंबई/पुणे

Railway Mega Block : 'या' मार्गांवर रेल्वेचा मेगाब्लॉक, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Local News : मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विद्याविहार–ठाणे आणि कांजूरमार्ग स्थानकावर पॉवर ब्लॉकमुळे वाहतुकीवर परिणाम होणार असून, प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच प्रवास करा असे आवाहन रेल्वेने केले आहे.

Alisha Khedekar

  • मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे

  • विद्याविहार–ठाणे व हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद राहणार

  • कांजूरमार्ग स्थानकावर पॉवर ब्लॉकमुळे वाहतुकीवर परिणाम होणार आहे

  • प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा असे आवाहन रेल्वेने केलं आहे

प्रवाशांनो दिवाळीच्या सुट्टीत बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर आधी रेल्वेचं वेळापत्रक जाणून घ्या. उद्या मध्य रेल्वेवर विद्याविहार-ठाणे दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गावर, तसेच हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर सकाळी ८ ते दुपारी दीड वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल.

या कालावधीत अप आणि डाउन मार्गावरील मेल-एक्सप्रेस जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहे. यामुळे मेल-एक्सप्रेस १० ते १५ मिनिट वेळाने धावणार आहेत. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी, बांद्रा दरम्यान सकाळी १०.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यत ब्लॉक असणार आहे. यादरम्यान सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे, गोरेगाव दरम्यानची लोकल सेवा बंद राहणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला ते पनवेल दरम्यान स्पेशल लोकल चालविण्यात येणार आहे.

कांजूरमार्ग स्थानकावर मध्यरात्री 'पॉवर ब्लॉक' घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग स्थानकावर कल्याण दिशेकडील जुन्या पादचारी पुलाचे ट्रस गर्डर्स हटविणे व उतरविणे यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री १२ ते रविवारी पहाटे ५ वाजेपर्यंत अप व डाउन धिम्या, जलद तसेच ५ आणि ६ व्या मार्गावर घेण्यात येणार आहे.

या कालावधीत धिम्या गाड्या जलद मार्गावर वाळविण्यात येतील. नाहुर, कांजूरमार्ग व विद्याविहार स्थानकांवर थांबणार नाहीत.दरम्यान दिवाळीच्या कालावधीत अनेक नागरिक फिरण्याच्या निमित्ताने बाहेर पडतात. मात्र उद्या मेगा ब्लॉक असल्या कारणाने मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे मध्यरेल्वेने रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा असे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिमला न जाता मेथी, ओवा आणि बडीशेपचं पाणी प्या, पोटावरची चरबी मेणासारखी वितळेल

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड! ओमराजेंसह ६ बंडखोर खासदार आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

Maharashtra News Live Update: - विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी, निकालाकडे सर्वांचे लक्ष

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

SCROLL FOR NEXT