dombivli railway station  Saam tv
मुंबई/पुणे

डोंबिवली ते CSMT प्रवास जलद होणार, गर्दीचा प्रश्न मिटणार; मध्य रेल्वेने घेतले महत्त्वाचे कामे हाती

central railway dombivli News : डोंबिवली ते CSMT प्रवास जलद होण्याची शक्यता आहे. कारण मध्य रेल्वेने महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत.

Saam Tv

मध्य रेल्वेकडून ठाणे आणि डोंबिवलीच्या कामासाठी मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेने घेतला होता १० तासांचा मेगा ब्लॉक

रेल्वेच्या कामामुळे लोकल प्रवास जलद होणार

मध्य रेल्वेने ठाणे आणि डोंबिवली येथे घेतलेला १५-डब्यांच्या फलाटाच्या विस्तारासाठीचा मेगा ब्लॉक यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. मध्य रेल्वेने तब्बल २१ मार्च रोजी १० तासांचा विशेष ब्लॉक घेतला होता. या ब्लॉकच्या कालावधित विविध कामे पूर्ण करण्यात आली. यामुळे भविष्यात डोंबिवलीपासून पुढे सीएसएमटीपर्यंतचा प्रवास जलद होणार आहे.

मध्य रेल्वेकडून ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्याशी संबंधित कामांच्या अंमलबजावणीसाठी हा ब्लॉक घेण्यात आला होता. ठाणे रेल्वे स्टेशनचे प्लॅटफॉर्म क्र. १, २, ३ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाजू आणि डोंबिवली प्लॅटफॉर्म क्र. १ए, १ व २ येथे 'अप' आणि 'डाऊन' उपनगरीय मार्गांवर ब्लॉक घेण्यात आला.

डोंबिवलीत कोणती कामे हातात घेण्यात आली?

रेल्वे मार्ग आणि पायाभूत सुविधांमध्ये बदल करण्यात आलाय. यामध्ये 'पॉइंट क्र. १२५ डब्ल्यू' काढून टाकणे आणि तो पुन्हा बसवणे, ४-५ मीटरचे 'स्ल्यूइंग' करून नव्याने टाकलेल्या १५० मीटर लांबीच्या सरळ मार्गाशी जोडलेला नवीन '१२५ डब्ल्यू क्रॉसओव्हर' कार्यान्वित करणे अशा कामांचा समावेश होता.

या कामामध्ये ७ ओएचई मास्ट्स/पोर्टल्स पाडणे, 'डाऊन लोकल लाईन'च्या बाजूने केबलिंगचे स्थलांतर करणे, रुळांचे सरकवणे आणि प्लॅटफॉर्मच्या विस्तारासाठी जागा निर्माण करणे यांचाही समावेश होता. याव्यतिरिक्त, 'अप लोकल' मार्गावर किमी ४८/२०० आणि ४७/२०० च्या दरम्यान दोन डीएसएल लोकोमोटिव्हसह ११ बीआरएन वॅगन्सचा वापर करून १३-मीटर पॅनेल्स (१० नग) उतरवण्याचे आणि भंगार साहित्य हटवण्याचे काम पार पाडण्यात आलेत.

ठाण्यात कोणती कामे घेण्यात आली होती?

ठाणे स्टेशनजवळ 'डाऊन लोकल लाईन'वर प्रगती साधण्यात आली होती. यात 'हायड्रा', 'जेसीबी' आणि 'पोकलेन' यांसारख्या अवजड यंत्रसामग्रीचा वापर करून 'क्रॉसओव्हर क्र. १४८ए/बी' चे जुने भाग काढून टाकणे आणि सुमारे ६० मीटर अंतरावर त्याचे पुनर्स्थापन करणे या कामांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, 'पीसीटीएम-०२१' या यंत्राचा वापर करून 'टर्नआउट्स' आणि 'क्रॉसओव्हर्स'चे (पॉइंट क्र. १३५बी, १४६ ए, १४८ए आणि १४८बी) 'टॅम्पिंग' करण्यात आले. या कामामुळे 'टर्नआउट लॅडर क्र. १४९ए/बी' चे स्थलांतर करण्यासाठी तसेच प्लॅटफॉर्म क्र. ३ आणि ४ च्या पुढील विस्तारासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध होण्यास मदत झालीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol-Disel: महागाईचा भडका! पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी वाढले, १ लिटरसाठी किती मोजावे लागणार?

BOB Recruitment: बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

धाराशिवच्या कळंबमध्ये भीषण अपघात; ट्रकखाली येऊन ५५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: दुचाकी फक्त दोनशे, तर चार चाकी वाहनामध्ये दोन हजार रुपयांचे इंधन भरता येणार

Amravati Accident : मुलीचा वर्गात पहिला नंबर आल्याच्या आनंदात पेढे वाटून परत येताना काळाचा घाला; आई वडिलांसमोर पोटच्या लेकीचा मृत्य

SCROLL FOR NEXT