Mumbai Local News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक, बाहेर पडण्याआधी वेळापत्रक वाचाच

Mumbai Local News : मध्य रेल्वेने रविवार २ नोव्हेंबर रोजी मुंबईतील सीएसएमटी ते विद्याविहार आणि कुर्ला-वाशी दरम्यान मेगाब्लॉक जाहीर केला आहे. देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी हा ब्लॉक असणार आहे.

Alisha Khedekar

मध्य रेल्वेने रविवार २ नोव्हेंबर रोजी मेगाब्लॉक जाहीर केला आहे

सीएसएमटी ते विद्याविहार आणि कुर्ला-वाशी दरम्यान रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार

ब्लॉक दरम्यान काही गाड्या रद्द आणि काही मार्ग बदलले जाणार

प्रवाशांना नियोजनपूर्वक प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तुम्हीदेखील रविवारचा प्लॅन करत असाल तर रेल्वेचे हे वेळापत्रक वाचा. मध्य रेल्वेने मुंबईतील काही स्थानकांदरम्यान उद्या मेगाब्लॉक जाहीर केला आहे. विविध अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक परिचालीत करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गांवर १०.५५ ते ५.५५ या वेळेत ब्लॉक राहील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून १०.४८ ते ५.४५ या वेळेत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार या स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील आणि विद्याविहार स्थानकावर पुन्हा डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील.

मध्य रेल्वेच्या घाटकोपर येथून १०.१९ ते ५.५२ या वेळेत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा या स्थानकांवर थांबतील.

कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप व डाउन हार्बर मार्गावर ११.१० ते ४.१० या वेळेत ब्लॉक राहील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून १०.३४ ते ५.३६ या वेळेत सुटणाऱ्या वाशी ,बेलापूर, पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या रद्द केल्या जातील. तसेच पनवेल, बेलापूर, वाशी येथून १०.१७ ते ५.४७ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – कुर्ला तसेच पनवेल – वाशी या विभागांदरम्यान विशेष उपनगरी गाड्या चालवल्या जातील.या दरम्यान १० : ०० ते ६ : ०० या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे–वाशी, नेरुळ दरम्यान प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

Thalapathy vijay To be a next CM : शेवटी 'विजय' झालाच! थलापती होणार तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री, दिवसभरात काय काय घडलं?

Ruchak Yog: 11 मे रोजी मंगळाच्या गोचरने बनणार रूचक राजयोग; या ३ राशी अचानक होणार गडगंज श्रीमंत

SCROLL FOR NEXT