Navi Mumbai Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO : नवी मुंबईत हॉटेलमध्ये जोरदार राडा; दोघांना 12 जणांकडून जबर मारहाण, संपूर्ण थरार CCTVमध्ये कैद

कोपरखैरणे येथील क्वालीटी ऑफ पंजाब हॉटेलमध्ये बुधवारी रात्री ही घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : नवी मुंबईतील १२ जणांच्या टोळक्याने दोन जणांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. एका हॉटेलमध्ये जेवत असताना किरकोळ कारणावरुन टोळक्याने दोघांना ही मारहाण केली आहे. गंभीर जखमी झालेल्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मारहाणीचा हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

कोपरखैरणे येथील क्वालीटी ऑफ पंजाब हॉटेलमध्ये बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. हॉटेलमध्ये जेवायला बसलेल्या दोघांसोबत त्याच हॉटेलमध्ये जेवायला बसलेल्या १० ते १२ जणांचा शुल्लक गोष्टीवरून वाद झाला. या वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. त्यानंतर १२ जणांनी मिळून दोघांना जबर मारहाण केली आहे. (Latest Marathi News)

मारहाण करताना टोळक्याने हातात मिळेत त्यांनी या दोघांना मारहाण केली. हॉटेलमधील खुर्च्या, जेवणाच्या प्लेट, बाटल्या यांच्या साह्याने मारत या दोघांना रक्तबंबाळ केलं. या मारहाणीत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

मारहाण करणाऱ्यांनी पीडितांच्या गळ्यातील चैन आणि मोबाईल देखील लंपास केले आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सर्व १२ आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT