Shinde vs Thackeray Group Clash  Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena News: मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर गुन्हा दाखल; मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप

Shiv sena Datta Dalvi News: मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांच्यावर भांडुप पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Satish Daud

Shinde vs Thackeray Group Clash

मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांच्यावर भांडुप पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेतून शिवीगाळ केल्याचा आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्यांवर दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यापूर्वी १८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबद्दल सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल ठाकरे गटाचे अंधेरीतील कार्यकर्ते हेमंत पालव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिंदे गटाच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता.

शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी (२७ नोव्हेंबर) भांडुपमधील ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहिर मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या 'हिंदुह्रदयसम्राट' या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी (Shiv sena Datta Dalvi) यांनी जोरदार टीका केली.

यावरून शिंदे गटाचे नेते तसेच कार्यकर्ते आक्रमक झाले. दत्ता दळवी यांनी जाहीर सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केली. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं, असा आरोप करत शिंदे गटाने पोलिसांत तक्रार दाखल केली.

त्यानुसार भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात भादवी कलम १५३(अ),१५३ (ब),१५३(अ)(१)सी, २९४, ५०४,५०५(१)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाता अधिक तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

"ओमराजे परत जा!" MPSC आंदोलनात शिंदेंच्या खासदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी, वातावरण तापले

SCROLL FOR NEXT